Devmanus Fame Actress Aishwarya Nagesh Doing Commentary In IPL 2024 marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devmanus Fame Actress Aishwarya Nagesh Doing Commentary In IPL : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली. चाहत्यांचं मनोरंजन करण्याची कोणताही संधी जिओ आणि स्टार यांच्याकडून सोडली जात नाही. मागील काही वर्षांपासून सामन्याचं समालोचन विविध भाषांमध्ये केले जातेय. हिंदी, इंग्रजीसोबत आता मराठीतूनही सामन्याचं समालोचन केले जाते. त्यासाठी काही दिग्गज मराठी कलाकार आणि खेळडूंना घेतलं जातं. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीवर सुत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवमाणूस या मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नागेश आयपीएल मराठीचं होस्टिंग करत आहे. केदार जाधव, जयदेव उनादकट यासारख्या खेळाडूंसोबत ऐश्वर्या होस्टिंग करताना दिसत आहे. 


झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला मराठी चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ही मालिका अनेकांना आवडली. या मालिके ऐश्वर्या नागेश हिनं प्रमुख पात्र साकारलं होतं. ऐश्वर्यानं या मालिकेमध्ये अर्पणाची भूमिका साकारली होती. ऐश्वर्याला आता आयपीएल होस्टिंग करण्याची संधी मिळाली आहे. ऐश्वर्या जिओ सिनेमासाठी होस्टिंग करत आहे. ऐश्वर्या नागेश हिने आयपीएल होस्टिंगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याशिवाय कौतुकाचा वर्षावही केला जात आहे. ऐश्वर्या नागेश हिनं आयपीएल होस्टिंगचा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. 


ऐश्वर्यानं महाविद्यालयीन आयुष्यात सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याशिवाय तिनं काही नाटकातही काम केलं होतं. मालेकित छोट्या-मोठ्या भूमिकाही केल्या. पण देवमाणूस या मालिकेमुळे ऐश्वर्याला राज्यभर ओळख मिळाली. आता आयपीएलच्या 17 व्या हंगामातही ऐश्वर्या आपला जलवा दाखवत आहे. आपला अनुभवाचा व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती म्हणतेय की, 26 मार्च 2024 आयपीएलमध्ये होस्टिंग करम्याचा पहिलाच अनुभव होता. मनामध्ये भीती, दडपण व उत्साह घेऊन मी स्टुडिओमध्ये पोहोचले. या शोमध्ये गेस्ट होते अतुल बेदाडे आणि सिद्धेश लाड. अनेक नवीन गोष्टी मला इथे पाहायला मिळाल्या शिकायला मिळाल्या अनेक तांत्रिक गोष्टी समजून घेता आल्या. आता मी खूप उत्सुक आहे माझ्या येणाऱ्या शूटसाठी. 


अधिक पाहा..



[ad_2]

Related posts