Bachchu Kadu Vs Navneet Rana amravati lok sabha election bjp vs prahar dinesh bub shiv sena mahararashtra politics marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अमरावती : राज्यातील इतर ठिकाणी काय करायचं यावर चर्चा होऊ शकते, पण अमरावतीमध्ये आमचा निर्णय झाला आहे, त्यात काहीही बदल होणार नसल्याचं प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्ट केलं. नवनीत राणांचा (Navneet Rana) आम्ही दोन लाखांनी पराभव करू, वेळ आलीच तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

अमरावतीबाबत कोणतीही चर्चा नाहीच

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, बच्चू कडू यांची युती ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, भाजपसोबत नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे काय निर्णय घेते ते पाहू, पण अमरावती जिल्ह्यात याबाबत कोणताही निर्णय होणार नाही. ब्रह्मदेव जरी खाली आले तरी अमरावती बाबत आमचा निर्णय कायम आहे. इतर महाराष्ट्रात काय करायचं त्याबाबत चर्चा होऊ शकते, मात्र अमरावती बाबत चर्चा नाही, कोणताही फोन नाही, काहीही नाही. 

नवनीत राणा भाजपमध्ये आहेत तर रवी यांना कुठे आहे? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. उद्या यांना घेतल्यानंतर भाजपचा स्वाभिमान पक्ष होऊ नये म्हणजे झालं असा टोलाही त्यांनी लगावला. 

नवनीत राणांचा दोन लाखांनी पराभव करू

नवनीत राणा यांनी महायुतीतील नेत्यांनी आपल्याला मदत करावी अशी विनंती केली होती. त्यावर बच्चू कडू म्हणाले की, आता तीर सुटला आहे, तो मागे येणार नाही. नवनीत राणा यांच्या विनंतीचा आम्ही आदर करतो पण आता तीर सुटला आहे, तो निशाणा साधूनच थांबेल.

नवनीत राणा यांचा दोन लाखाने पराभव करू, वेळ आली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. 

बच्चू कडूंच्या पक्षाचा उमेदवार जाहीर

अमरावती लोकसभेसाठी नववीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी सुरुवातीपासूनच केली होती. पण भाजपने राणांनाच संधी दिली. त्यामुळे महायुतीत असलेले बच्चू कडू कमालीचे नाराज झाले. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद जुनाच असून एकमेकांच्यात विस्तवही जात नसल्याची परिस्थिती आहे. त्याचमुळे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर केली.

दिनेश बूब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते. त्यांनी आता बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये प्रवेश केला आणि नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपाटले. 

अमरावतीमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हेदेखील इच्छुक होते. पण ही जागा भाजपने शिवसेनेकडून काढून घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळदेखील नाराज आहेत. अभिजित अडसूळे यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts