Rohit Sharma Mumbai Indians Marathi News: Rohit Sharma tied with Dinesh Karthik for the unwanted record of most ducks in the IPL

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma Mumbai Indians Marathi News: ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी आणि रियान परागच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्नने (Rajastahn Royals) 27 चेंडू शिल्लक असताना मुंबईचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हा सलग तिसरा पराभव आहे. तर राजस्थानचा हा सलग तिसरा विजय आहे. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सचे टॉप-3 फलंदाज एकही धाव न काढता माघारी गेले. रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma)) नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना खाते उघडण्यात अपयश आले. याचदरम्यान रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

रोहित शर्माच्या नावावर नको असलेला विक्रम-

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत रोहित शर्माशिवाय, दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. आतापर्यंत ग्लेन मॅक्सवेल 15 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे.

पियुष चावला चौथ्या क्रमांकावर-

यानंतर पियुष चावला चौथ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत पियुष चावला 15 वेळा आयपीएल सामन्यांमध्ये एकही धाव न काढता बाद झाला आहे. याशिवाय मनदीप सिंग आणि सुनील नरेनही प्रत्येकी 15 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त रोहित शर्मा आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सचा भाग होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.

गुणतालिकेची काय स्थिती?

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. तर दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाला अद्याप एकाही पराभवाचा सामना करावा लागला नाही.  राजस्थानचा संघ गुणातलिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या:

Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video

Rohit Sharma: चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग; रोहित शर्माची 5 सेकंड्सची रिॲक्शन अन् जिंकलं पुन्हा मन!

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts