लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडलेल्या एका घटनेनं वैद्यकीय क्षेत्र अचंबित झालं आहे. बाळाला पाहून रुग्णालयातील डॉक्टर आणि कुटुंबीय घाबरले. जन्मापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला होता. बाळाचा रंग पांढरा होता. त्याचे दात, डोळ्यांच्या पापण्या विचित्र दिसत होत्या. बाळाला पाहून डॉक्टरांची भीतीनं गाळण उडाली. या आजाराबद्दल माहिती मिळवण्यासाठी डॉक्टरांनी बाळाच्या त्वचेचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.बाळ आनुवंशिक त्वचा विकारानं (हार्लेक्विन इक्थियोसिसू) पीडित असल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र नगरच्या खासगी रुग्णालयात गुरुवारी बाळाचा जन्म झाला. आईच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाला होता असं डॉक्टरांनी सांगितलं. आजाराबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी त्वचेची बायोप्सी केली आहे. केरिया टायमिन तपासणीसाठी नमुने घेतले आहेत.
भररस्त्यात ५००-५००च्या नोटा उडवल्या, गाड्या थांबल्या; महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
बरेलीतील फतेहगंजमध्ये राहणाऱ्या महिलेच्या पोटी बाळ जन्माला आलं. गर्भातच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी बाळ दाखवल्यानंतर कुटुंबातील मंडळींना धक्काच बसला. याआधीही देशात हार्लेक्विन बेबींच्या जन्माच्या घटना घडल्या आहेत. डॉक्टरांनी बाळाच्या त्वचेचे नमुने तपासासाठी पाठवले आहेत. शरीरात प्रोटिन आणि म्युकस मेंबरेन नसल्यानं बाळाची अवस्था अशी झाली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे.
कुटुंबानं शोधूनही सापडला नाही; तरुणाचा मृतदेह त्याच्याच घरात सापडला; खड्डा खणून कोणी गाडलं?
प्रोटिन आणि म्युकस मेंबरेनच्या कमतरतेमुळे बाळाची त्वचा जाड होते. सोबतच त्वचेचा रंग बदलून तो पांढरा होतो. अनेकदा गर्भातच बाळं दगावतात. हार्लेक्विन बेबीचा जन्म झाल्याचं समजताच रुग्णालयात चर्चा सुरू झाली. अशा बाळांचा जन्म नेमका कसा होतो, कोणत्या घटकांमुळे अशी बाळं जन्माला येतात, असे प्रश्न वैद्यकीय वर्तुळाला पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.