[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Crime News: कोणताही गुन्हेगार कायद्यापासून फार वेळ लपून राहू शकत नाही, असं म्हणतात. याला दुजोरा देणारी घटना समोर आली आहे. हत्येच्या आरोपीला 30 वर्षानंतर अटक करण्यास यश आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) ही कामगिरी केली आहे.
लोणावळा येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी 30 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 युनिटने अटक केली आहे. आरोपी आपले नाव आणि ओळख लपवून मागील अनेक वर्षापासून मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहत होता. अविनाश भीमराव पवार (49 वर्षे ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा विक्रोळी परिसरात टुरिस्ट गाडी चालवण्याचे काम करत होता.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील यशोधा बंगला, सत्यम सोसायटी, याठिकाणी वयोवृध्द असलेले दाम्पत्य धनराज ठाकर्सी कुरवा, (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी धनलक्ष्मी धनराज कुवा ( वय 50 वर्षे ) यांचा त्यांचे घरात घुसून दोरीच्या सहाय्याने गळा आवळून आणि धारधार शस्त्राने भोकसून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
लोणावळा शहर पोलीस पोलीसांनी अमोल जॉन काळे उर्फ टिल्लु व विजय अरुण देसाई या दोघांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी अविनाश भीमराव पवार ( तत्कालीन वय 19 वर्षे) फरार झाला होता. लोणावळा पोलीसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु पाहिजे असलेला पवार आरोपी सापडला नाही.
असा सापडला आरोपी
आरोपी संदर्भात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखा 9 नंबर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली. आरोपी स्वत:चे मूळ नाव आणि ओळख बदलून मुंबईत वावरत आहे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी एक पथक नेमले आणि आरोपी वर पाळत ठेवत त्याची माहिती मिळविली.
आरोपीची एकंदरीत वागणूक संशयास्पद वाटल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेत तपास केला. त्यावेळी त्याने आपले नाव अविनाश भीमराव पवार असे सांगितले. हाच आरोपी लोणावळा पोलीस ठाणे गु.र. क्र.80/1993 कलम 302, 34 भादंवि मधील फरार आरोपी असल्याची माहिती समोर आली. आरोपी सध्या नाव बदलून अमित भीमराज पवार या नावाने विक्रोळी पूर्व, मुंबई 83 याठिकाणी राहत असल्याची कबुली दिली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून आता पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
[ad_2]