Tripti Dimri On Virat Kohli Animal Movie Tripti Said, Virat Kohli Is My Favourite Cricketer Anushka Sharma India Vs South Africa

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tripti Dimri on Virat Kohli : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत असतानाही छोटेखानी रोल करून तृप्ती डिमरी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे ग्लॅमरच्या दुनियेत तिची चर्चा सुरु झाली आहे. तृप्ती डिमरीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तृप्तीने अनेक गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता किंग विराट कोहलीचे (Tripti Dimri on Virat Kohli )नाव घेतलं. 


तृप्ती विराटबद्दल म्हणाली तरी काय?

तृप्ती डिमरी म्हणाली की, विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेटर आहे आणि यात शंका नाही. विराट कोहलीची जगभरातील फॅन फॉलोअर्स प्रचंड आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीही या यादीत सामील झाली आहे.


तृप्तीने आतापर्यंत सहा चित्रपट केले आहेत. अॅनिमलमध्ये झोयाची भूमिका साकारणारी तृप्ती डिमरी खूप प्रशंसा मिळवत आहे. याशिवाय ती तिच्या एका बोल्ड सीनमुळेही चर्चेत आहे. काही चाहत्यांना तृप्ती डिमरीचा रणबीर कपूरसोबतचा बोल्ड सीन आवडला नाही. सोशल मीडियावर तिला अभिनेत्रीला सतत ट्रोल करत आहेत. तृप्तीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 2017 मध्ये श्रीदेवीच्या मॉम या चित्रपटातून केली होती. आतापर्यंत तिने 6 चित्रपट केले आहेत.


किंग कोहली ब्रेकवर 

दुसरीकडे, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे तर तो 2023 वर्ल्ड कपनंतर ब्रेकवर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत विराट कोहली संघाचा भाग नव्हता. त्याचवेळी विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 आणि वनडे खेळणार नाही. मात्र, कसोटी मालिकेत विराट कोहली संघात पुनरागमन करेल. विराट कोहलीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या बॅटने चमकदार कामगिरी केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts