Sanjay Gaikwad candidature from withdrawn in Buldhana Lok Sabha Constituency Support to Prataprao Jadhav marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Buldhana Lok Sabha Constituency) शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाकडून (Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर देखील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) उमेदवारी दाखल केला होता. मात्र, आता आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा गायकवाड यांनी केली आहे. विशेष म्हणजे ज्या उद्देशासाठी आपण अर्ज दाखल केला होता, तो उद्देश आता सफल झाला असल्याने आपण माघार घेत असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत. पण, तो उद्देश कोणता हे वेळ आल्यावर सांगेल असेही गायकवाड म्हणाले. 

‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देतांना संजय गायकवाड म्हणाले की, “आज मी प्रतापराव जाधव यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत जाणार आहे. त्यांना निवडणून आणण्यासाठी आणि पुन्हा देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. माझा उमेदवारी अर्ज लवकरच मी मागे घेत आहे. माझा जो काही उद्देश होता तो सफल झाल्याने आता उमेदवारी अर्ज मेग घेणार असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत. 

विजयराज शिंदे यांच्यावर टीका…

दरम्यान भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी देखील बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर बोलतांना संजय गायकवाड म्हणाले की, ‘विजयराज शिंदे हा काल परवा पर्यंत उद्धव गटाकडे उमेदवारी मागत होता. बुलढाणा जिल्ह्यात विजयराज शिंदे याने भाजप पक्ष संपवला आहे. विजयराज शिंदे यांच्यामागे निष्ठावान भाजप कार्यकर्ते नाहीत. लवकरच विजयराज शिंदे यांचा उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला जाईल. आम्ही महायुतीकडे तशी मागणी करणार आहोत. ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे आणि प्रतापराव जाधवच निवडणूक जिंकतील असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. 

प्रतापराव जाधवांच्या उमेदवारी दाखल कोणताही मोठा नेता नाही

विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना महायुतीकडून शिवसेनेची उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आपला उमेदवारी अर्ज ते आज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी जाधव हे एका सभेला संबोधित करतील. विशेष म्हणजे मागील तीन लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव सतत विजयाचा भगवा फडकवतांना पाहायला मिळत आहे. असे असतांना त्यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी पक्षाचा किंवा महायुतीचा एकही मोठा नेता येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts