Riyan Parag: Mother emotional as soon as son reaches out of hotel; gave a big hug to Parag, see the emotional video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. काल म्हणजेच 1 एप्रिलला रियान परागने मुंबई इंडियन्सविरुद्ध 54 नाबाद धावांची स्फोटक फलंदाजी केली. यानंतर रियान परागला आयपीएलची ऑरेंज कॅप देण्यात आली. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप होती. 

राजस्थानाच्या विजयानंतर रियान पराग जेव्हा हॉटेलला पोहचला. तेव्हा रियानच्या आईने त्याचे स्वागत केले. रियानला गठ्ठ मिळी मारत गालावर चुंबन घेतलं. यावेळी रियानची आई भावूकही झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच ऑरेंज कॅपही रियानने आपल्या आईच्या हाताने घातली. राजस्थानने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुझ्या आई इतके कोणीही तुझ्यावर प्रेम करत नाही.”  

रियान पराग त्याच्या या स्फोटक खेळीबद्दल काय म्हणाला?

मुंबईविरुद्धच्या खेळीनंतर रियान पराग म्हणाला, “गेल्या 3-4 वर्षात माझी आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिलेली नाही. परफॉर्मन्स नसतो, तेव्हा परत येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मी खूप सराव केला आहे. मला अशा परिस्थितीची सवय आहे. वडिलांना घरून सर्व काही पहायला आवडते. त्यांना प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायला आवडते. पण यावेळी आई स्टेडियममध्ये उपस्थित होती”, असं रियान पराग म्हणाला.

राजस्थानचा सलग तिसरा विजय

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सने सलग तिसरा सामना जिंकला.

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् लखनौ सुपर जायंट्स भिडणार

आयपीएल 2024 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी आणि लखनौचा सामना सुरु होईल. 

संबंधित बातम्या-

IPL 2024 Orange Cap: सामने अन् धावा सेम टू सेम! तरीही रियान परागला दिली ऑरेंज कॅप , कोहली कुठे राहिला मागे?

Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts