congress leader nana patole reaction on congress fielded a candidate against prakash ambedkar in akola vba mva alliance maharashtra politics maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Politics: अकोला लोकसभा (Akola Loksabha) मतदारसंघात काँग्रेसने डॉ. अभय काशिनाथ पाटील (Abhay Patil) यांना उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याविरोधातच उमेदवार दिल्याने मविआ आणि वंचित मधील युतीच्या सर्व शक्यता आता जवळ जवळ मावळल्या आहेत अकोल्यात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात (Prakash Ambedkar) उमेदवार दिल्याने आता वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. अशातच आता या शक्यतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दुजोरा दिला आहे.

मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये सामील करण्यासाठी गेलो होतो. मात्र, त्यांनी आमची वारंवार चेष्टाच केलीय. असे असतानाही काँग्रेसच्या वतीने आम्ही आपली भूमिका पक्षश्रेष्ठींनी समजून सांगितली होती. आम्ही पूर्ण तयारीत देखील होतो. पण, त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपले उमेदवार उभे करायचं काम सुरू केलं. याचा अर्थ त्यांना आमची साथ नको होती, हेच त्याच्यातून सिद्ध होतंय म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी उमेदवार घोषित केल्याचे स्पष्टोक्ती नाना पटोले यांनी दिलीय. 

काँग्रेस संपवण्याचा प्लॅन

यावेळी बोलतांना नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाण साधत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अशोक चव्हाण यांना आता काँग्रेसवर बोलायचा अधिकार नाही. त्यांच्या भोकर विधानसभेत त्यांची काय अवस्था आहे, लोक त्यांना येऊ देत नाही.  ही अवस्था आपण आज बघत आहोत. त्यामुळं काँग्रेसवर बोलणं त्यांनी आता टाळावं. काँग्रेसच्या नावावर त्यांनी आजवर खूप काही कमविलं. काँग्रेसच्या नावानं खूप राजयोग त्यांनी भोगलाय. काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केला होता, बरं झालं आज ते आमच्यात नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे. ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याचं आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोकं तुम्हाला माफ करणार नाही, असा प्रतिहल्ला देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावर केलाय.

एका व्यक्तीला वाचवण्यापेक्षा संविधान वाचवणं महत्त्वाचं

जनता आता सुजाण झाली आहे. जनतेला सर्व गोष्टी कळलेल्या आहेत. एका व्यक्तीला वाचवण्यापेक्षा आज संविधान वाचवणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीचा आहे, एका व्यक्तीचा नाही. शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणी राज्यातल्या जनतेच्या हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये बसलेली आहे. ज्या पद्धतीने या शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीला संपवण्याचं प्रयत्न काही लोक करतात आहेत, त्याला उत्तर आता लोक या निवडणुकीमध्ये देतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts