आधी गोडसे, मग भुजबळ, अन् आता दादा भुसेही तातडीने मुंबईला रवाना; नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मिठाचा खडा पडला आहे. ही जागा छगन भुजबळांना मिळणार अशी कुणकुण लागताच विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी तातडीने मुंबई गाठली आहे. गोडसेंपाठोपाठ छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील मुंबई गाठत आहेत. आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhujbal) देखील यवतमाळचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून मुंबईचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. 

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र या नंतर महायुतीच्या नेत्यांनी यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. भाजपकडे (BJP) जास्त ताकद आहे, असे म्हणत नाशिक जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याने शिवसेनेत (Shiv Sena) मोठी खळबळ उडाली.

यवतमाळचा दौरा रद्द करत दादा भुसे मुंबईला रवाना

गोडसे, भुजबळ यांच्या पाठोपाठ आता दादा भुसे (Dada Bhuse) देखील मुंबईला रवाना झाले आहेत. दादा भुसे यांचा आज यवतमाळ दौरा होता. मात्र दौरा रद्द करून ते तातडीने मुंबईकडे निघाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Election) उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव आणि तिढा वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भुजबळ नक्की कुणाला भेटणार ? 

छगन भुजबळ यांनी काल येवल्यात बोलताना पक्षाने आदेश दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असे म्हटले होते. तसेच दिल्लीतून माझे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले, असे देखील त्यांनी म्हटले होते. आता छगन भुजबळ देखील मुंबईत पोहोचले असून ते नक्की कुणाला भेटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मुंबई दौरा आणि उमेदवारी याचा काही संबंध नसल्याचे भुजबळ यांच्या गोटातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

भुजबळ की गोडसे ? कुणाला मिळणार उमेदवारी ? 

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी छगन भुजबळांनी मिळाली तर हेमंत गोडसे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आता जर भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यास हेमंत गोडसे बंडखोरी करत निवडणूक लढवणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नाशिक जागा हेमंत गोडसेंनाच मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Mahayuti Seat Sharing : नाशिक, संभाजीनगरची जागा आमचीच, सर्वांनी युती धर्म पाळावा; संजय शिरसाट थेटच बोलले

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts