Pune Sasoon Hospital News Death of a patient in Sassoon Hospital due to rat bite in ICU In pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल 30 वर्षीय तरुणाला आय सी युमध्ये उंदीर चावलाय. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय.  सागर रेणूसे नावाचा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघातग्रस्त झाल्याने 16 मार्चला त्याला ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आणि आय सी यु मध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.  मात्र 26 मार्चला आय सी यु मधे त्याच्या डोक्याला,  कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला.  त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याच निधन झालंय. डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच मान्य केलंय.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts