गौतम अदानींनी नातीसह शेअर केला फोटो, म्हणाले ‘सर्व संपत्ती…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी एक्सवर आपल्या 14 वर्षांच्या नातीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी आपल्याला नातीला उचलून घेतलेलं आहे. कावेरी असं त्यांच्या नातीचं नाव आहे. कावेरी ही गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी आणि पत्नी परिधी यांची मुलगी आहे. गौतम अदानी यांनी आपल्या नातीसाठी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोतून त्यांनी आजोबा-नातीमधील नात्यातील गोडवा दाखवला आहे. 

“या लोभस डोळ्यांमधील चकाकीसमोर जगातील सर्व संपत्ती फिकी आहे,” असं गौतम अदानी यांनी म्हटलं आहे. 

लंडनमधील सायन्स म्युझियममधील नवीन अदानी ग्रीन एनर्जी गॅलरीमध्ये घेतलेल्या या फोटोमध्ये ते आपल्या नातीसोबत हसताना दिसत आहे. फोटोमध्ये गौतम अदानी यांची पत्नी आणि कावेरीचे आई-वडीलही हसताना दिसत आहेत.

गौतम अदानी यांनी आपल्या नाती आयुष्यातील सर्वात मोठी तणावमुक्ती असल्याचं सांगतात. “मला माझ्या नातींसह वेळ घालवायला प्रचंड आवडतं. त्या माझ्या सर्वात मोठ्या तणावमुक्ती आहेत. काम आणि कुटुंब, माझे फक्त दोन जग आहेत. कुटुंब माझ्यासाठी शक्तीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे,” असं गौतम अदानी म्हणाले होते. 

अदानी कुटुंब लंडनमझीस संग्रहालयाच्या नवीन प्रदर्शनाच्या भेटीला गेले होते. ‘ऊर्जा क्रांती: अदानी ग्रीन एनर्जी गॅलरी’ नावाच्या प्रदर्शनाचं 26 मार्च रोजी लंडनमध्ये अनावरण करण्यात आलं. अक्षय ऊर्जेद्वमुळे निर्माण झालेली आव्हानं आणि संधींची माहिती यातून देण्यात आली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे, जी जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जा संक्रमणाचे नेतृत्व करते.

Related posts