gallit gondhal dillit mujra marathi movi pattern repetition in Yavatmal Washim Lok Sabha Constituency while filling lok sabha election form maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yavatmal Washim Lok Sabha: लोकसभा निवडणुकांचे(Lok Sabha Elections 2024) पडघम केव्हाच वाजले असून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Second Phase) निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. असे असताना यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघामध्ये एका उमेदवाराने ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ (Gallit Gondhal Dillit Mujra) या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. यात झाले असे की, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मनोज गेडाम यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना चक्क 12 हजार 500 रुपयांची चिल्लर आपल्या नामनिर्देशन पत्रासोबत जमा केली आहे.

परिणामी, ही रक्कम मोजतांना संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात असलेली ही चिल्लर मोजतांना यात बराच वेळ गेल्याने अधिकाऱ्यांनी नामांकन अर्जाची पडताळणी केली आणि तो अर्ज ठेवून घेतला. मात्र मनोज गेडाम यांनी दुसऱ्या दिवशी हि रक्कम स्वतःच मोजून निवडणूक विभागाला द्यावी आणि आपला उमेदवारी अर्ज भरावा, असे  सांगण्यात आले आहे. मात्र या प्रसंगामुळे मराठी चित्रपटातील त्या खास किस्स्याची आठवण या निमित्याने झाली आहे.   

कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मनोज गेडाम हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे. गेडाम यांना लोक गुरुदेव या टोपण नावानेही ओळखतात. मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, आणि दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. त्यामुळेच सामान्य जनता माझ्या पाठीशी असून मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वासही मनोज गेडाम यांनी बोलताना व्यक्त केलाय. जनतेच्या पैशातूनच मी ही निवडणूक लढवणार असून त्यांनी दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो असल्याचेही ते म्हणाले. 

डिपॉझिट म्हणून सगळेच कॉइन नाही चालणार भाऊ!

 लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. असे असताना निवडणुकीचा अनुषंगाने  फॉर्म भरताना निवडणूक आयोगाकडून काही अटी शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडून ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ पॅटर्नवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाचा अनुभव आता प्रत्येक निवडणुकीत अधिकाऱ्यांना पाहायला मिळतो आहे. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटतो. तर एक एक रुपया मोजताना, वेळ जातो तो वेगळा. मात्र यंदा कुठल्याही उमेदवाराला केवळ एक हजार रुपयांचेच कॉईन देता येणार आहेत. त्यामुळे आता या नियमांचे कितपत पालन होतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts