महाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

Read More

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, ‘त्यांना लवकर..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Stones Thrown In CM Roadshow: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये ते जखमी झाले आहेत. विजयवाडा येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या रो शोमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रोड शो सुरु असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यापैकी एक दगड मुख्यमंत्र्यांना लागल्याने ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला दगड लागल्याने छोटी खोच पडली आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे. नक्की घडलं काय? युवाजन सार्मिका रायतू काँग्रेस पार्टीचे (आयएसआरसीपी) आमदार वेल्लामपल्ली श्रीनिवास राव…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.   

Read More

‘आम्ही काय आंधळे वाटलो का?,’ सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं ‘तुम्ही फार हलक्यात घेताय’

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसुद्दीन अमनुल्लाह यांनी यादरम्यान दोघांना अत्यंत कडक शब्दांत सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं जाणुनबुझून, इच्छेने आणि वारंवार उल्लंघन करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.  पंतजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी मागितलेल्या सर्व माफी फेटाळताना आपण आंधळे नाही आहोत अशा शब्दांत सुनावलं आहे. तसंच आम्ही या प्रकरणी उदार होऊ इच्छित नाही असंही सांगितलं. पतंजली विरोधात इतके दिवस कारवाई न केल्याबद्दल कोर्टाने उत्तराखंड परवाना प्राधिकरणावर ताशेरे ओढले.…

Read More

LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे.   

Read More

‘माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,’ काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला ‘भाजपात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना काँग्रेस नेते आणि आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी मोठं विधान केलं आहे. ए के अँटनी यांनी आपल्या मुलाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे असं म्हटलं आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत. इंडिया आघाडी पुढे जात असून, भाजपा आता खाली जात आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी आहे. आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात सतत लढत आहे असं ए के अँटनी म्हणाले आहेत. …

Read More

गौतम अदानींनी नातीसह शेअर केला फोटो, म्हणाले ‘सर्व संपत्ती…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी एक्सवर आपल्या 14 वर्षांच्या नातीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी आपल्याला नातीला उचलून घेतलेलं आहे. कावेरी असं त्यांच्या नातीचं नाव आहे. कावेरी ही गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी आणि पत्नी परिधी यांची मुलगी आहे. गौतम अदानी यांनी आपल्या नातीसाठी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोतून त्यांनी आजोबा-नातीमधील नात्यातील गोडवा दाखवला आहे.  “या लोभस डोळ्यांमधील चकाकीसमोर जगातील सर्व संपत्ती फिकी आहे,” असं गौतम अदानी यांनी म्हटलं आहे.  लंडनमधील सायन्स म्युझियममधील नवीन अदानी ग्रीन एनर्जी गॅलरीमध्ये घेतलेल्या…

Read More

‘CBI सारख्या यंत्रणांनी…’, चंद्रचूड यांचा सल्ला; कान टोचत म्हणाले, ‘मागील काही वर्षांमध्ये..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On CBI: केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्रीय यंत्रणांना खडेबोल सुनावले आहेत. 20 व्या डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेतील आपल्या भाषणामध्ये न्या. चंद्रचूड यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. केंद्रीय तपास यंत्रणांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच या यंत्रणांनी आता आर्थकि गैरव्यवहार आणि देशविरोधी कायरवायांचा समावेश असलेल्या प्रकरणांकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला हवं, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.  सीबीआयने आपल्या भूमिकेवर ठाम राहणं गरजेचं माझ्या मते मागील काही वर्षांमध्ये आपण आपल्या केंद्रीय…

Read More

एअरपोर्टवरच्या Conveyor बेल्टवरील तरुणीच्या चाळ्यांमुळे लोकांचा संताप! म्हणाले, 'हिच्याकडून..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Shoot Reel On Airport Conveyor Belt: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अनेकांनी किमान विमानतळावर तरी हे असले रिल शूट करु नका असं म्हटलं आहे.

Read More

‘सॉरी ताई, मला..’, WhatsApp मेसेज करुन कॉलेज इमारतीवरुन मारली उडी; बापाला म्हणाली, ‘मी आता..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) 17 Year Old Girl Jump To Death: विशाखापट्टणममधील एका 17 वर्षीय विद्यार्थीने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी आपल्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर या मुलीने एक लांबलचक मेसेज पोस्ट केला होता. या मेसेजमध्ये तिने माझा लैंगिक छळ झाला असून मी याबद्दल कॉलेज प्रशासनाकडे तक्रार करु शकत नाही कारण माझा छळ करणाऱ्याने माझे अश्लील फोटो काढले असून ते पोस्ट करण्याची धमकी मला दिली आहे, असंही नमूद केलं आहे. माझ्याबरोबर शिकणाऱ्या इतरही काही विद्यार्थीनींचं लैंगिक शोषण झाल्याचा दावा या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या…

Read More