‘सरकार राहुल गांधींना घाबरले’, ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, ‘अहंकारी राजाची..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: “अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो ‘रावणराज्या’चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर ज्या पद्धतीने सरकारपुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला ‘रावणराज्य’ नाही तर काय म्हणायचे?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. “राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच सातत्याने अपशकुन करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांच्या इशाऱ्याने सुरू आहेत,” असंही ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने म्हटलं आहे.…

Read More

‘अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: “हिंडेनबर्गप्रकरणी उद्योगपती अदानी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला यात आश्चर्य वाटावे, धक्का बसावा असे काही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘दिलासा’ निर्णयानंतर गौतम अदानी हे आनंदाने गदगदून म्हणाले, ‘‘सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते.’’ याप्रकरणी सत्य खरोखरच जिंकले असेल तर आनंदच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका असल्या तरी आक्षेप घेण्याचे कारण नाही, पण अदानींच्या बाबतीतच अलीकडे सत्याचा विजय होतो व इतरांच्या बाबतीत सत्य भूमिगत होते, हे असे का व्हावे?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. अदानींविरोधात ईडीने गुन्हा दाखल…

Read More

मोदींनी ‘या’ भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘पाशवी बहुमत आहे म्हणून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Truck Driver Strike: “उफराटे कायदे करतातच कशाला? पाशवी बहुमत आहे म्हणून मनमानी करण्याचा अधिकार तुम्हाला ना घटनेने दिला आहे ना जनतेने. परंतु ‘मेरी मर्जी’ म्हणत पाशवी बहुमताच्या जोरावर अन्याय्य कायदे मंजूर करून घ्यायचे आणि जनतेवर त्यांचा दांडपट्टा फिरवायचा, हेच मोदी सरकारचे धोरण आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकावर ‘हिट ऍण्ड रन’ कायद्यावरुन टीका केली आहे. ‘हिट ऍण्ड रन’ संदर्भातील कायदे केंद्र सरकारने तातडीने लागू होणार नाही असं स्पष्ट केल्यानंतर नवीन मोटर वाहन कायद्यातील तरतुदींच्या विरोधात ट्रकचालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला. मात्र या प्रकरणावरुन झालेला गोंधळ…

Read More

‘देशात फक्त ‘अंधभक्त’ आणि संसदेत फक्त…’; ‘सरकार घाबरलं’ म्हणत ठाकरे गटाचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) 141 MP Suspended: विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताऱ्यांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच होणार आहे, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. जगात देशाची नाचक्की झाली. त्याची जबाबदारी म्हणून सरकारतर्फे काय पावले उचलली जाणार आहेत? असा प्रश्न संसदेतील घुसखोरीबद्दल विचारला तर काय चुकलं असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे. अमित शाहांवर साधला निशाणा ठाकरे गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली आहे. “संसदेचे हिवाळी अधिवेशन फक्त विरोधी पक्षांच्या…

Read More

काँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thackeray Group Slams PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील भाषणात काँग्रेसवर भ्रष्टाचारावरुन केलेल्या टीकेचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतात नंतर तोच पक्ष किंवा तेच नेते भाजपासोबत जातात असं थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतर पक्षांना ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ म्हणणारा भाजपा पक्षच ‘लूट का मॉल’ आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान’ असेल तर आजची भाजप म्हणजे ‘लूट का मॉल’ आहे, असा टोला ठाकरे गटाने…

Read More

…तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे ‘फटकारे’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उद्धव ठाकरे गटाने महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकार 9 वर्षांपूर्वी सत्तेत आल्यानंतर चित्र फारसे बदलेले नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. टोमॅटोचे दर 150 वर गेलेत तर अनेक भाजांनी त्रिशतक गाठलं असलं तरी केंद्रातील सरकार ढीम्म असल्याचा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. टोमॅटोच्या शेतांवर डाका घालण्यात येत असल्याची प्रकरण समोर येत आहे तर टोमॅटो आता केवळ मिम्स आणि रिल्सपुरता मर्यादीत राहिला असून तो पेट्रोलपेक्षाही महाग झाला असल्याचं म्हणत ठाकरे गटाने या…

Read More

महाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read More