ipl hardik pandya was going become captain in t20 world cup rohit sharma know story from navjot singh sidhu

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Hardik Pandya Captaincy : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरले आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकत हार्दिककडे धुरा सोपवली होती. पण चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही. रोहित शर्माच्या समर्थकांनी हार्दिक पांड्याला हूटिंग तर केलीच, त्याशिवाय मुंबईच्या संघाला सोशल मीडियावर ट्रोल केले. वानखेडे स्टेडियमवर सोमवारी मुंबईचा सामना झाला. या सामन्यावेळीही हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. रोहित शर्माची जागा घेणाऱ्या हार्दिक पांड्याची जागा घेण्याच्या निर्णायावर चाहतेच नाही, तर माजी खेळाडूही अवाक झाले आहेत. रोहित शर्माची नेमकी चूक काय होती, की त्याला कर्णधारपदावरुन बाजूला केले? असा प्रश्न माजी खेळाडू नवजोत सिंह सिद्धू यांनी मुंबई इंडियन्सला प्रश्न विचारला.  भारताचा हिरो, भारताचा कर्णधार, आपल्या फ्रेंचायजीचा कर्णधार नाही, ही गोष्ट कुणालाच रुचली नाही.  रोहित शर्माची नेमकी चूक काय झाली? असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे, असे सिद्धू म्हणाले. 

रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे मुंबई संघाची धुरा सोपवण्याबाबत फ्रेंचायजीला निशाण्यावर धरलं जातेय. अनेकांच्या मते, मुंबई इंडियन्सने मोठी चूक केली आहे. हार्दिक पांड्या आगामी टी 20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आशा चर्चा मागील काही महिन्यापूर्वी सुरु होत्या. दुखापतीआधी हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या टी 20 संघाची धुरा संभाळत होता. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकात हार्दिक पांड्याच भारतीय संघाची धुरा संभाळेल, असं म्हटलं जात होतं. आयसीसीने जारी केलेल्या पोस्टरमध्येही हार्दिक पांड्याचा फोटो होता. पण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी विश्वचषकात रोहित शर्माचं नेतृत्व करणार असल्याचं स्टेसमेंट केले. त्यानंतर सर्व खेळ बदलला. 

नवजोत सिंह सिद्धू यांच्या मते, बीसीसीआयकडून रोहित शर्माबाबतची घोषणा आणखी आधी झाली असती, तर मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला कर्णधार केलेच नसते. सिद्धू म्हणाले की, “ऑक्टबर 2023 मध्ये जर बीसीसीआयकडून रोहित शर्मा टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची धुरा संभाळणार असल्याचं जाहीर केले असते. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माबाबतचा निर्णय घेतलाच नसता. कारण, भारतीय संघाचा कर्णधारच आपल्या संघाचा कर्णधार आहे, असा विचार त्यांनी केला असता. हार्दिक पांड्याला ट्रेड केले नसते, अथवा कर्णधार केलेच नसते. ” दरम्यान, सध्या मुंबईच्या संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे, तर भारताच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार रोहित शर्मा आहे. 
 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts