Nagpur Lok Sabha Election dcm Devendra Fadnavis and nitin gadkari campaign and show of strength in nagpur by lok samvad yatra bjp maharashtra politics maharashtra marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha 2024 Nagpur :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून आज उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये प्रचार करत आहेत. ऐकिकडे नागपूरसह विदर्भात उष्णतेचा पारा दिवसागणिक तापत असतानाच आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे राजकारण देखील चांगलेच तापताना दिसत आहे. नागपूरात (Nagpur) उष्णतेच्या पाऱ्याने केव्हाच चाळीशी ओलांडली असली तरी या रणरणत्या उन्हाची कुठलीही तमा न बाळगता नागपूरतील भाजपचे दोन दिग्गज नेते आज प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

एकट्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून 65 हजारांची आघाडी

दक्षिण-पश्चिम नागपूर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने फडणवीस हे देखील या लोकसंवाद यात्रेत सहभागी झाले आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ म्हणूनच महत्त्वपूर्ण नाही तर, या मतदारसंघातून भाजपला मोठ्या मताधिक्यांनी विजय संपादन करण्यात मोठी मदत झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 65 हजारांची आघाडी एकट्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून भाजपचे उमेदवार असलेल्या नितीन गडकरी यांना  मिळाली होती. त्यामुळे यंदा देखील तशाच पद्धतीची आघाडी नागपूर मध्ये भाजपने अपेक्षित केली आहे. 

त्याच अनुषंगाने आज नागपूर मध्ये भाजपचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर हा स्थानिक राजकारणात भाजपसाठी एक प्रकारे गड मानला जातो. नागपुरातील सर्वाधिक भाजपचे नगरसेवक याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचे संघटन या परिसरात प्रचंड मजबूत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून याचा फायदा भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे संघटन कौशल्याच्या दृष्टीने या मतदारसंघात भाजपने अधिक जोर लावल्याचे दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला 

असे असले तरी मतदारांना साद घालण्यासाठी तसेच जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळत आहे. नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारच्या दारापर्यंत जात सलग तिसऱ्यांदा विजयासाठी साद घालत आहेत. तर काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते हे देखील नागपूरात आपल्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा चुरशीचा सामना रंगणार हे मात्र या निमित्याने निश्चित झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts