VBA decided to support supriya sule baramati and announcement of candidate list vasant more from pune lok sabha election maharashtra politics marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची (Vanchit Bahujan Aaghadi) जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. वंचित आघाडीनं पुण्यातून वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी जाहीर केली आहे तर बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा दिला आहे. बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचं स्पष्ट करत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे.  

वंचितकडून महाविकास आघाडीसोबत मैत्रिपूर्ण लढत होत असल्याचं चित्र सध्यातली दिसतंय. कारण या आधीही वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागूल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts