Vasant More candidate for pune loksabaha election From vba against murlidhal mohol and Ravindra dhangekar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : अखेर वंचितकडून पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तिघेही तगडे उमेदवार असून ही लढत काहीशी अटीतटीची होण्याची शक्यता आहे. मात्र मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या दोन्ही उमेदवारांपैकी वसंत मोरेंना कोणता उमेदवार जड जाणार? कोणत्या उमेदवाराकडून वसंत मोरेंना धोका आहे? असं विचारल्यास वसंत मोरेंनी पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं आहे. 4 जूनला सगळी उत्तरं मिळेल, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. 

वसंत मोरे म्हणाले की,  भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर असेल. दोघांची माझे सभागृहामध्ये अतिशय चांगले संबंध आणि ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मी यशस्वी करेल. ज्यांना टीका करायची ते टीका करत राहतील आणि टीका करणाऱ्यांना मला जे उत्तर द्यायचं असेल ते 4 जूनला मिळेल, असं म्हणत वसंत मोरेंनी दोन्ही उमेदवारांना थेट आव्हान दिलं आहे. 
 

कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार?

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरी होतो तरी तेव्हा सुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला हे संपूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्राने पाहिलेले आहे. माझा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न होता तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे. पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा प्रचाराचा पहिला मुद्दा असेल. पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचा कुठलं काम करायचं असेल तर मी ते वाहतूक या विषयावरती करेल, असंही ते म्हणाले. 

या संघर्षातून मी यशस्वी होईल!

विकासासंदर्भात वसंत मोरे म्हणाले की,  चार वर्षे पूर्ण कालावधीपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला विकासकाम काही नवीन नाही आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये त्यामुळे मला वाटते की संघर्ष करत राहायला पाहिजे आणि मी तो करत राहील आणि या संघर्षातून मी यशस्वी होईल. 

इतर महत्वाची बातमी-

Vasant More: सुजात आंबेडकरांची ‘ती’ दोन वाक्य ऐकून मी भरुन पावलो; वसंत मोरेंनी सांगितला राजगृहावर घडलेला किस्सा

 

पाहा व्हिडीओ-

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts