shiv sena Vaishali Darekar challenges to shrikant shinde Kalyan Lok Sabha Election uddhav thackeray vs eknath shinde maharashtra politics marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ठाणे : श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे दोनदा खासदार झाले ते शिवसैनिकांमुळे, ज्या शिवसैनिकांनी त्यांना खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांचा पराभव करतील असं सांगत ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar ) यांनी रणशिंग फुंकलं. श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक होणार नाही, समोर चांगला बॉलर असेल तर कधी कधी हॅट्रिक चुकते असा टोलाही त्यांनी लगावला. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तर ठाकरे गटाकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होते, मात्र सस्पेन्स कायम होता. आज हा सस्पेन्स संपला. शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

काय म्हणाल्या वैशाली दरेकर?

माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंद झाला आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडणार,  मी शिवसेनेची खासदार म्हणून लोकसभेत जाणार असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला. 

समोर कोण आहे हे महत्त्वाचं नाही असं सांगत वैशाली दरेकर म्हणाल्या की, कधीकधी हॅट्रिक चुकते, समोरचा बॉलर जर जुना जाणता असेल तर हॅट्रिक चुकते. श्रीकांत शिंदे यांनी आतापर्यंत ज्या शिड्या पार केल्या त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंनी मदत केली आहे. ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांना दोन वेळा खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांना पाडणार. 

कोण आहेत वैशाली दरेकर? (Who Is Vaishali Darekar)

वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खंद्या समर्थक आहेत. वैशाली दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे यांच्यासोबत मनसेमध्ये गेल्या. 2009 मध्ये त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबतच राहणे पसंत केले होते. 

वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संघटनात्मक पदे आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवले. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सभागृह दणाणून  सोडले होते. वैशाली दरेकर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. याबाबत त्यांना विचारलं असतं त्यांनी समोर कितीही तगड आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. 

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी हे ज्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत त्या ठिकाणी ठाकरे गटाकडून सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सत्यजित पाटील हे कोल्हापुरातील शाहूवाडी-पन्हाळा विधानसभेचे माजी आमदार आहेत. 

  • वैशाली दरेकर : कल्याण
  • सत्यजित पाटील : हातकणंगले
  • करण पवार : जळगाव
  • भारती कामडी : पालघर

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts