amravati lok sabha election 2024 prahar mla bacchu kadu Criticized mla ravi rana mahayuti navneet rana mahararashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amravati Lok Sabha Election 2024 : आम्ही कोणत्या नेत्याचे गुलाम होऊ शकतं नाही. मात्र, आम्ही कालही जनतेचे गुलाम होतो आणि पुढेही असू. पैसा असल्यामुळे एकाच घरातील नवरा बायकोला आमदार, खासदार होता येतं. घरात सत्ता, पैसा असल्यामुळे हे सगळं होतं. मात्र, म्हणून आम्ही काय केवळ मत द्यायचे कां? सर्वसामान्य गरिबांना केवळ मत मागण्यासाठी ठेवले आहे का? मोदीजी म्हणायचे अच्छे दिन आयेंगे. म्हणून 17 रुपयांची साडी वाटली म्हणजे अच्छे दिन आले का, असा प्रश्न उपस्थित करत प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राणा दाम्पत्यावर परत एकदा घनाघाती टीका केली आहे.

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Election) मतदारसंघासाठी प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी अमरावती मध्ये प्रहरच्या वतीने जनआंदोलन नामांकन यात्रा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत चौफेर फटकेबाजी केली. 

कार्यकर्ता म्हणून कार्यक्रताच्या नेतृत्वात लढणार

आगामी निवडणूक ही एका कार्यकर्त्याची निवडणूक आहे. निवडणुकीत नम्र होऊन, मतदारांचे आशीर्वाद घेऊन निवडणूक लढवावी लागते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला धमकवण्याचे प्रयत्न केल्या गेले. म्हणून आम्ही येणारी निवडणूक मनातून इच्छा नसताना देखील काहींना उत्तर देण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून लढणार आहे. येणाऱ्या निवडणुकींचे जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा हे चित्र स्पष्ट असेल की, या या देशात नेतागिरी, अर्थकारणातून राजकारण चालणार नाही. आगामी निवडणूक ही देशात सन्मान निर्माण करणारी आहे. तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्मितेची ही निवडणूक असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

आज अमरावती शहराची काय अवस्था करून ठेवली आहे. इकडे तुम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम घेत आहात. मात्र फिनले मिलचा कामगार, शेतकरी हा शेतीच्या बांधावर आत्महत्या करत आहेत. या फिनले मिलसह केंद्राने 23 मिल बंद केल्या आहेत. त्यामुळे आज 23 हजार लोक रस्त्यावर आले आहेत. याबाबत टेक्स्टाईल मंत्री पियुष गोयल यांना जाब विचारला तर ते या विषयावर बोलायला तयार नाही. त्यामुळेच आम्ही बोललो होतो की, निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला. अलीकडे जाती-धर्मावर बोलणारे अनेक टोळ्या सज्ज झाल्या आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर बोलणारे शोधून सापडत नाही, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

…म्हणूनच हा बच्चू कडू अपक्ष आमदार

आज शेतात उभे पिक उखाडून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. कृषी संबंधित सर्व निर्णय केंद्रात होतात. कांद्याची निर्यात बंद केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. मात्र या विषयावर एकही खासदार दिल्लीच्या तख्तापुढे बोलला नाही. आमदार-खासदार, कलेक्टरचे पगार वेळेवर होतात. मात्र सर्वसामान्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळत नाही. अशा मुद्द्यांवर बोललं तर तिकीटही  मिळणार नाही म्हणून अनेकांची वाचा गेली आहे. म्हणूनच हा बच्चू कडू अपक्ष आमदार असून प्रहार करण्यासाठी सज्ज झाला असल्यासही बच्चू कडू म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts