Namdev Jadhav I will be fight Baramati got Vision to from Shivaji maharaj Baramati lok sabha election 2024 marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  शरद पवारांबद्दल (Sharad Pawar)  काही दिवसांपूर्वी  आक्षेपार्ह वक्तव केल्यामुळं ज्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं होतं त्या नामदेव जाधवांनी (Namdev Jadhav) बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. हे जाहीर करताना छत्रपत्री शिवाजी महाराजांनी (Chatrapati shivaji maharaj) स्वप्नात येऊन आपल्याला निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर मागील जन्मात आपण लखुजी जाधवराव होतो, असेही नामदेव जाधव म्हणालेत.  एवढंच नाही तर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडलं त्या पद्धतीनं आपल्याला देखील जमिनीखाली गुप्तधन सापडेल असे तारे नामदेव जाधव यांनी तोडलेत. या सगळ्या दाव्यांमुळं तुमच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल कारवाई होऊ शकते का? असं विचारल्यावर आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचं नामदेव जाधव म्हणाले आहेत. 

नामदेव जाधव म्हणाले की,  बारामतील मतदार संघ हा  शहाजी राज्यांच्या जाहगिरीचा प्रदेश आहे. सिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या निर्मितीचं केंद्रबिंदू आहे. इथेच शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे. पहिला किल्ला ताब्यात दिलेला तोरणा किल्लादेखील इथेच आहे. संभाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्लादेखील याच मतदारसंघामध्ये आहे. यातील कोणत्याही किल्ल्यांचा विकास झालेला नाही. या किल्ल्यांचा विकास व्हावा, अशी इच्छा आहे. त्यात मी निवडणूक लढावी अशी इच्छादेखील अनेकांनी बोलून दाखवली आहे.  असं असतानाच मला पहाटे शिवाजी महाराजांची पुण्यतीथी असलेल्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिलला दृष्टांत झाला. छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला, असा दावा  केला आहे.
 
ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांचं वास्तव्य असलेल्या बारातमीजवळ  असलेल्या चार किल्ल्यांवर जाणारे हायवे, रोपवे, हेलिपॅड असावे. असं केल्यास चार लाख तरुणांना रोजगार मिळेल. चार लाख तरुणांसोबत चार लाख कुटुंबांना पैसे मिळतील आणि बारामती लोकसभेतून कोणीही बेरोजगार राहणार नाही, हे सगळं शिवाजी महाराजांनी साडे चारशे वर्षापूर्वी तयार करुन दिलं आहे. मात्र हे वाडे पडत आहे आणि आम्ही झोपडी बांधण्याची तयारी करत आहोत, हे आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला असल्याचं ते म्हणाले. 

निवडणुकीसाठी पैसे कुठूण आणणार असं विचारल्यास नामदेव जाधवांनी शिवाजी महाराजांच्या काळातील उदाहरण दिलं आहे. पैसे कुठून आणायचे हा प्रश्न स्वराज्य स्थाप करताना शिवाजी महाराजांनादेखील होता. त्यावेळी तोरणा किल्ल्यावर त्यांना सात रांंजण भरुन हांडे सापडले होते. हे सगळं शहाजी राजांनी त्यांना पाठवले होते. त्यामुळे आता आम्ही एक वोट आणि एक नोट असं लोकांना सांगणार आहोत. लोकांच्या विकासासाठी हे सगळं सुरु आहे. त्यामुळे लोकांनी पुढाकार घेऊन त्यांनी ताकद द्या आणि लेकरांच्या रोजगारासाठी उभे रहा, असं ते म्हणाले आहेत. 

नामदेव जाधव कोण आहेत?

नामदेव जाधव हे  शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. शाळेत असताना गैरमार्गाने गुण वाढवले म्हणून नामदेव जाधव यांना विद्यार्थी, पालक व शाळा प्रशासनाने धक्के मारून शाळेतून हाकलून लावलं होतं. नामदेव जाधवच्या विरोधात विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हाही दाखल आहे. सध्या ते जामीनावर आहे. ते राज्य सरकारमधील एका मंत्र्याकडून सुपारी घेऊन शरद पवार यांच्यावर टीका करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. 

इतर महत्वाची बातमी-

Vasant More : रुसले,फुगले, राजीनामा दिला, उमेदवारीसाठी फिर फिर फिरले अन् अखेर वसंत मोरे पुण्याच्या मैदानात उतरले, राजीनाम्यापासून आतापर्यंत काय काय घडलं?

 

 

 

अधिक पाहा..

Related posts