Delhi Hit And Run Case In Delhi Hit And Dragged On The Bonnet Video Goes Viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hit & Run Case :  राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला ट्रॅव्हलर टेम्पो बसने धडक दिली. इतकंच नाही तर ही व्यक्ती बोनेटवर असताना बस थांबली नाही. सुदैवाने या घटनेत त्या तरुणाला कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. मात्र, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

बसची धडक, युवकाला फरफटत नेले

ही घटना रविवारी, 17 डिसेंबर रोजी रात्री 11:27 वाजता घडली असल्याची माहिती आहे.  लाजपत नगर पोलीस स्टेशनला ट्रान्सफर पीसीआर कॉलद्वारे याबाबतची माहिती मिळाली. फोन करणार्‍याने सांगितले की, लाजपत नगरहून डीएनडी फ्लायओव्हरने नोएडाला जात असताना लाजपत नगर भागात एका ड्रायव्हरने त्याला धडक दिली. त्यामुळे त्याने थेट ट्रॅव्हलर टेम्पो बसच्या बोनेटवर उडी घेतली. मात्र, चालकाने बस थांबवली नाही. चालकाने थेट डीएनडी उड्डाणपुलावर नेले. पीसीआर कॉलवरून मिळालेल्या माहितीवरून हा कॉल हेड कॉन्स्टेबल दिनेश यांच्याकडे कारवाईसाठी देण्यात आला. त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉलरशी संपर्क साधला असता, कॉलरने उत्तर प्रदेशात असून तक्रार करण्यासाठी परत येऊ शकत नसल्याचे सांगितले.

पोलिसांकडून कारवाईला सुरुवात 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत हंस गोल्डन नावाच्या टेम्पो बसच्या बोनेटवर एक युवक जीव मुठीत घेऊन उभा आहे. टेम्पो ट्रॅव्हलर बस चालकाने बस थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने चालवली. पोलिसांकडून आता तक्रारदार युवकाला बोलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून त्याच्या तक्रारीवर कारवाई करता येऊ शकेल. 

 



[ad_2]

Related posts