Wardha Arogya Sankalp Abhiyaan At Selu Wardha Social Forum And Acharya Vinoba Bhave Rural Hospital More Than Two Thousand Patients Examined

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वर्धा: वर्ध्याच्या सेलू येथे वर्धा सोशल फोरम (Wardha Social Forum) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय (Acharya Vinoba Bhave Rural Hospital) सावंगीच्या वतीने आरोग्य संकल्प अभियान राबविण्यात आले. या अभियायानात सुमारे दोन हजार रुग्णांनी नोंदणी करून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने तपासणी करत सुविधा पुरविल्या. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी या संकल्प अभियानाचे आयोजन केले होते. खासदार रामदास तडस आणि माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील रुग्णतपासनीसाठी हे अभियान उपयुक्त ठरले आहे.

गेल्या काही वर्षात आरोग्याच्या समस्या वाढल्या आहे. कर्करोग, हृदयरोग यासारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढते आजाराचे प्रमाण लक्षात घेता सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाने पुढाकार घेतला. आपण सतत रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळेच विदर्भात ठिकठिकाणी सेवा देण्यात आम्हाला यश आले असे यावेळी अभिमत आरोग्य विद्यापीठाचे कुलपती खासदार दत्ता मेघे यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातील जनतेसाठी अशाप्रकारच्या अभियानाची गरज आहे. सावंगी रुग्णालयात अनेक ठिकाणावरून रुग्ण येतात या रुग्णांना शांततेत ऐकून घेत समाधान करण्याचे प्रयत्न रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतात,  असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

डॉ. अभ्युदय मेघे यांनी याप्रसंगी तळागाळातील माणसांपर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचा प्रयत्न करीत रुग्णसेवेला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक सेलू येथील आरोग्य शिबिरात पोहचले. आरोग्यसेवेच्या अत्याधुनिक दोन मोबाईल व्हॅन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विविध आजारावरची तपासणी यातून करण्यात आली.

या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, मेडिसिन, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसारोग, श्वसनरोग, मूत्रविकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, मानसोपचार, त्वचारोग, दंतरोग व मौखिक आजार या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णतपासणी, निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचार निःशुल्क करण्यात आली. 

शिबिरातून उपचारांकरिता सावंगी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची जाण्यायेण्याचा तसेच निवास आणि भोजनाची व्यवस्था वर्धा सोशल फोरमद्वारे करण्यात येईल असेही यावेळी रुग्णांना सांगण्यात आले. याशिवाय सोनोग्राफी, एमआरआय, एक्सरे, रक्त व लघवी तपासणीसह सर्वसामान्य चाचण्या मोफत करण्याची सुविधा करण्यात आली. प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभ रुग्णांना करून दिला जाणार असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सांगितले.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts