Bank Interest News Business 8 Banks Changed Interest Rates Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bank Interest Rate : अनेक बँकांनी 2023 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये त्यांचे मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) आणि रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) बदलले आहेत. बँकेने केलेल्या या बदलामुळं सर्वसामान्यांच्या कर्जाच्या ईएमआयमध्येही बदल दिसून येत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या पतधोरणात कोणताही बदल केला नसला तरी डिसेंबर महिन्यात देशातील अर्धा डझनहून अधिक बँकांनी कर्जदरात बदल केले आहेत. जाणून घेऊयात बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात नेमके काय बदल केले आहेत. 

चालू डिसेंबर महिन्यात, IDBI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँक यांनी त्यांचे व्याजदरात बदल केले आहेत. जर आपण कॅनरा बँकेबद्दल बोललो तर, बँकेने 12 डिसेंबर 2023 पासून आपल्या RLLR मध्ये बदल केले आहेत. या बँकांनी त्यांच्या MCLR आणि RLLR मध्ये कसे बदल केले आहेत ते देखील पाहुयात.

कॅनरा बँक 

कॅनरा बँकेने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेने 12 डिसेंबर 2023 पासून वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांचे MCLR दर बदलले आहेत.या बँकेनं व्याजदर 8 टक्क्यांवर नेले आहेत. एका महिन्याच्या कर्जाचा दर 8.1 टक्के, तीन महिन्यांच्या कर्जाचा दर 8.2 टक्क्यांवर आला आहे. सहा महिन्यांसाठी कर्जाचा दर 8.55 टक्के आहे. एक वर्षाच्या कर्जाचा दर 8.75 टक्के आणि दोन वर्षांच्या कर्जाचा दर 9.05 टक्क्यांवर आला आहे. बँकेने तीन वर्षांच्या कर्जाचा दर 9.15 टक्के ठेवला आहे. कॅनरा बँकेने RLLR मध्येही बदल केले आहेत. जे 12 डिसेंबरपासून 9.25 टक्के करण्यात आले आहे.

IDBI बँक 

IDBI बँकेचा कर्जाचा दर 8.3 टक्के आहे.
एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 8.45 टक्के आहे.
IDBI बँकेने तीन महिन्यांचा MCLR दर 8.75 टक्के दिला आहे.
सहा महिन्यांचा MCLR 8.95 टक्के आहे.
एक वर्षाचा MCLR 9 टक्के आहे.
दोन वर्षांसाठी MCLR 9.55 टक्के आहे.
तीन वर्षांसाठी MCLR 9.95 टक्के आहे.

हे सर्व कर्ज दर 12 डिसेंबर 2023 पासून लागू आहेत.

बँक ऑफ इंडिया 

युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन MCLR दर 11 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत प्रभावी आहेत. दर 7.9 टक्के आहे. एका महिन्याचा MCLR 7.95 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR 8.35 टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR 8.6 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 80.8 टक्के आहे. दोन वर्षांचा MCLR 8.9 टक्के आहे. तीन वर्षांचा MCLR 9.05 टक्के आहे.

बँक ऑफ बडोदा 

बँक ऑफ बडोदा (BoB) ने 12 डिसेंबर 2023 पासून त्यांचा MCLR बदलला आहे. MCLR 8 टक्के आहे. एका महिन्याचा MCLR 8.3 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR 8.4 टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR 8.55 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 8.75 टक्के आहे.

ICICI बँक 

ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने 1 डिसेंबर 2023 पासून आपला MCLR बदलला आहे. कर्जाचा दर 8.5 टक्के आहे. एका महिन्यासाठी MCLR आधारित कर्जाचा दर 805 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 8.55 टक्के आहे. सहा महिन्यांचा दर 8.9 टक्के आहे. एक वर्षाचा दर 9 टक्के आहे.

बंधन बँक 

बंधन बँकेने 1 डिसेंबर 2023 पासून त्यांचे MCLR आधारित कर्ज दर बदलले आहेत. रात्रभर आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 7.07 टक्के आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदर 8.57 टक्के आहे. एक, दोन आणि तीन वर्षांचा MCLR दर 11.32 टक्के आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक (PNB) ने 1 डिसेंबर 2023 पासून त्यांच्या MCLR मध्ये बदल केले आहेत. रात्रभर सुधारित MCLR 8.2 टक्के आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 8.25 टक्के आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 8.35 टक्के आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दर 8.55 टक्के आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी PNB चा MCLR दर 8.65 टक्के आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा दर 9.95 टक्के आहे.

बँक ऑफ इंडिया

सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदार, बँक ऑफ इंडियाने 1 डिसेंबर 2023 पासून आपल्या MCLR मध्ये सुधारणा केली आहे. रात्रीचे सुधारित दर 7.95 टक्के होते. एका महिन्याचा MCLR दर 8.25 टक्के आहे. बँक ऑफ इंडियाच्या कर्जदारांसाठी तीन महिन्यांचा MCLR 8.25 टक्के आहे. तीन महिन्यांसाठी MCLR 8.4 टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.६ टक्के आहे. तीन वर्षांसाठी MCLR 9 टक्के आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

EMI : निवडणुका येताच कर्जमाफीच्या अपेक्षेने लोक कर्जाचे हप्ता भरणे बंद करतात का?  RBI ने दिला हा कडक इशारा

[ad_2]

Related posts