Uddhav Thackeray Meet Arvind Kejriwal Delhi Alliance Meeting Visit Satya Pal Malik And Mamata Banerjee Maharashtra Politics Update | Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. मंगळवारी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक (I.N.D.I.A) होणार असून त्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीला पोहोचले आहेत. त्यावेळी त्यांनी केजरीवाल यांची भेट घेतली. 

I.N.D.I.A आघाडीतील सर्व पक्षांची पुन्हा बैठक होणार आहे. साडेतीन महिन्यांनी विरोधी आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबरला होत आहे. या बैठकीत जागावाटप आणि लोकसभा निवडणुकीबाबतचा समान जाहीरनामा यावर चर्चा होऊ शकते. या बैठकीसाठी दिल्लीत उपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत आणि आपचे खासदार राघव चड्ढा उपस्थित होते.

 

सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंना भेटणार (Satya Pal Malik To Meet Uddhav Thackeray)

मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेंना भेटायला जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी पुलवामा दहशतवादी घटनेवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर आरोप करत अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची होणारी भेट ही महत्त्वाची मानली जाते. 

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील ही बैठक अभिषेक बॅनर्जी यांच्या दिल्लीतील साऊथ एव्हेन्यू या निवासस्थानी झाली.

इंडिया आघाडीची बैठक ( I.N.D.I.A Alliance Delhi Meeting Update) 

I.N.D.I.A आघाडीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 27 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, पीडीपीकडून मेहबूबा मुफ्ती, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

ईडीचे केजरीवाल यांना समन्स 

अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने 21 डिसेंबर रोजी केजरीवाल यांना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या आगामी बैठकीतही या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल हे विपश्यनेसाठी जाणार असून 30 डिसेंबरपर्यंत ते उपस्थित राहणार नसल्याची माहितीही अलीकडेच समोर आली आहे. त्याच वेळी ईडीने त्यांना नोटीस पाठवल्याने त्यावर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

ही बातमी वाचा: 

 



[ad_2]

Related posts