IND Vs WI 2nd T20 Live Updates India playing against West Indies match highlights Providence Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND Vs WI 2nd T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज (रविवार, 6 ऑगस्ट 2023) दुसरा टी 20 सामना होणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिजने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया उतरणार आहे. 

वेस्ट इंडिज आणि भारत हे दोन्ही संघ गयानामध्ये आमनेसामने असतील. पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाला हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.  पण या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? तसेच, सामना कुठे आणि कसा पहायचा, याबाबत जाणून घेऊयात

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 26 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 8  सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

कुठे खेळला जाणार सामना? 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी20 सामना प्रोव्हिडन्स स्टेडिअम, गयानामध्ये खेळवला जाईल. 

कधी आहे सामना? 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना 6 ऑगस्ट, रविवारी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर संध्याकाळी 7.30 वाजता नाणेफेक होईल. 

टीव्हीवर कुठे पाहाल लाईव्ह? 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना भारतात टीव्हीवर दूरदर्शनमार्फत लाईव्ह प्रसारित केला जाईल. 

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल? 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याला फॅनकोड (अॅप आणि वेबसाईट) आणि जियो सिनेमा (अॅप आणि वेबसाईट) मार्फत लाईव्ह स्ट्रिम केलं जाईल. जिओवर सामना मोफत पाहता येईल.

एबीपी माझाच्या संकेतस्थाळावरही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

भारताची संभावित प्लेईंग 11 –

शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार

वेस्ट इंडिजचे 11 शिलादार कोण?

काइल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिम्रोन हेटमेयर, रोवमैन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, अल्ज़ारी जोसेफ आणि ओबेड मैककॉय

टीम इंडियाचा टी20 संघ 
यशस्वी जायसवाल, ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, रवि बिश्नोई, तिलक वर्मा. 

वेस्ट इंडीजचा टी20 संघ 
काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शिमरोन हेटमायर, रोवमॅन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय, ओशाने थॉमस, ब्रँडन किंग, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड. 

[ad_2]

Related posts