ipl 2024 kkr vs dc sunil narine raghuvanshi andre russell beat delhi capitals bowlers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विशाखापट्टणम : आयपीएलमध्ये (IPL 2024) मध्ये आज सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवणाऱ्या केकेआरनं (Kolkata Knight Riders) आक्रमक फलंदाजी केली. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केकेआरच्या टॉप ऑर्डरनं सार्थ ठरवला. फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेन यांच्य जोडीनं केकेआरला चांगली सुरुवात करुन दिली.  केकेआरच्या 60 धावा झालेल्या असतानाच फिलीप सॉल्ट 18 धावा करुन बाद झाला. यानंतर खऱ्या अर्थानं सुनील नरेनच्या वादळी खेळीला सुरुवात झाली. सुनील नरेननं अगकृष रघुवंशीच्या साथीनं जोरदार फटकेबाजी सुरु ठेवली. केकेआरनं 11 व्या ओव्हरलाच 150 धावांचा टप्पा पार केला. सुनील नरेन, रघुवंशी, आंद्रे रस्सेल, श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंगच्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरनं 7 विकेटवर 272 धावा केल्या. 

सुनील नरेन (Sunil Narine) आणि रघुवंशीची शतकी भागिदारी

फिलीप सॉल्ट बाद झाल्यानंतर आलेल्या रघुवंशीनं देखील मोठी फटकेबाजी केली. सुनील नरेन आणि रघुवंशी यांनी 100 धावांची भागिदारी केली. सुनील नरेनं 39 बॉलमध्ये 85 धावा केल्या. सुनील नरेननं 7 चौकार आणि 7 षटकार लगावत केकेआरला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. सुनील नरेन बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परत जात असताना शाहरुख खान, गौतम गंभीरसह कोलकाताच्या इतर खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्याच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं. 
अगकृष रघुवंशीनं देखील आज 25 बॉलमध्ये 50 धावा केल्या. रघुवंशी 5 चौकार आणि तीन सिक्ससह 54 धावा करुन बाद झाला. 

आंद्रे रस्सेलची (Andre Russel ) फटकेबाजी

सुनील नरेन आणि रघुवंशी बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या आंद्रे रस्सेल आणि सुनील नरेननं फटकेबाजी केली.श्रेयस अय्यरनं 18 धावा केल्या. आंद्रे रस्सेलनं यावेळी देखील फटकेबाजी केली. त्यानं 18 बॉलमध्ये 41 धावा केल्या. रिंकू सिंगनं 19 व्या ओव्हरमध्ये तीन सिक्स मारत 28 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सनं 20 ओव्हर्समध्ये 7 विकेटवर 272 धावा केल्या. 

दिल्ली केकेआरचा विजयरथ रोखणार?

कोलकाता नाईट रायडर्सकडून जोरदार फटकेबाजी करणाऱ्या सुनील नरेन आणि रघुवंशी यांना बाद करत दिल्लीनं कमबॅक केलं. काही वेळ दिल्लीच्या गोलंदाजांनी केकेआरच्या धावांचा वेग कमी करण्यात यश मिळवलं होतं. दिल्ली कॅपिटल्सपुढं केकेआरनं विजयासाठी 273 धावांचं आव्हान ठेवलं आहे. यंदाच्या आयपीएलमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. काही दिवसांपूर्वी सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सविरोधात 277 धावा केल्या होत्या. आता केकेआरनं 20 ओव्हर्समध्ये 7 बाद  272 धावा केल्या आहेत. 

संबंधित बातम्या : 

 Virat Kohli : भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, विराट कोहलीच टी-20 वर्ल्ड कपमध्ये किंग, बाबर आझमच्या नावावर किती धावा?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts