Ram Satpute on praniti shinde solapur Airport and IT Park will be set up in Solapur BJP candidate Ram Satpute s words maharashtra Politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर : पंतप्रधान मोदीजींजवळ (PM Modi) जाऊन बसेन पण विमानतळ (Airport) सुरु करेन हा माझा शब्द आहे, असं म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी सोलापूरकरांना शब्द दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर प्रचार आणि सभांचा धडाका सुरु झालेला पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहे. अशात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलेल्या टीकेला राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे.

विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द

ऑगस्ट महिन्यात सोलापुरातून विमानतळ सुरु होईल. त्यासाठी मी मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे. सोलापुरातील एमआयडीसी पुन्हा नव्या जोमाने उभा करेन. चादर आणि टॉवेल उद्योगासाठी टेक्स्टाईल पार्क उभं करणार, सोलापुरातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंसाठी वर्ल्ड क्लास एक्जीबिशन सेंटर उभारणार, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी, मी त्यांना बोलणार नाही. 

सोलापूरकरांसाठी आयटी पार्क उभा करणार

पुढील पाच वर्षात सोलापूरला 25 वर्षे पुढे नेईल हा शब्द देतो. विमानतळ सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांसाठी उत्तम प्रकारचं आयटी पार्क उभा करणार, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे, अशी घोषणा भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केली आहे. ते सोलापुरातील प्रचारादरम्यान बोलत होते.

10 वर्षात भाजप खासदार काहीही करू शकले नाहीत

गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदाराने सोलापूरसाठी काही केलं नाही. सोलापूरचे खासदार विमान सेवा सुरू करू शकले, पाईपलाईन आणू शकले नाही, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्या पुढे म्हणाल्या होत्या की, आज भाजपचे उमेदवार येतात, पण ते 10 वर्षात काय करू शकले, हे सांगू शकत नाहीत, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. यानंतर भाजप उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आता फक्त विकास बोलणार

मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पुण्याच्या धर्तीवर सोलापूरमध्ये आंतराराष्ट्रीय विमानतळ उभारणार आहे. ही निवडणूक मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. यापुढे आम्ही प्रणिती शिंदे यांना विनम्रपणे सांगतो की, तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या, तरीही मी तुम्हाला उत्तर देणार नाही. केवळ विकास, विकास, विकास हे बोलणार, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts