Government CM And DCM Bungalow Pending Millions of rupees water bills Maharashtra news ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Government Bungalow: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं लाखो रुपयांचं पाणी बिल थकलं
तुमचं पाणीपट्टी थकली तर महानगरपालिका किंवा नगर परिषदेकडून तात्काळ कारवाई होते. मात्र आपल्या व्यवस्थेमध्ये पद बघून नेहमीच अपवाद केले जातात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं लाखो रुपयांचं पाणी बिल थकलंय. पाणी बिलाची एकूण ९५ लाखांची रक्कम मुंबई महानगरपालिकेनं वसूल केलेली नाही. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीच्या अधिकारात हा तपशील मागवला होता. केवळ मुुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच नव्हे, तर सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत यांच्या शासकीय बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे, त्यामुळे सामान्यांना एक न्याय आणि शासकीय निवासस्थांवर मेहेरनजर, हे मुंबई महानगरपालिकेचं धोरण आहे का, असा सवाल संतप्त मुंबईकर विचारत आहेत. 

[ad_2]

Related posts