prakash ambedkar changed Yavatmal Washim Constituency candidate Subhash Khem Singh Panwar given ticket to Abhijeet Laxmanrao Rathod

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वाशिम : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक (Loksa Sabha  Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाकडून आतापर्यंत अनेक मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वंचितने उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीपुढे मतफुटीची चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडाने यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Nashik) या लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार बदलला आहे. येथे नव्याने अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना तिकीट देण्यात आले आहे. 

अभिजित राठोड यांना तिकीट

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी अगोदर सुभाष खेमसिंग पवार यांना तिकीट दिले होते. उमेदवारी मिळाल्यानंतर खेमसिंग यांच्याकडून जोमात प्रचार केला जात होता. मात्र वंचितने ऐनवेळी खेमसिंग पवार यांना माघार घ्यायला लावली आहे. आता पवार यांच्याऐवजी अभिजित लक्ष्मणराव राठोड हे वंचितचे अधिकृत उमेदवार असतील. तशी माहिती खुद्द वंचित बहुजन आघाडीने दिली आहे. पवार यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता. मात्र असे असताना येथून उमेदवार बदलण्याचा निर्णय वंचितने घेतला आहे.

भावना गवळी यांचं तिकीट कापलं

गेल्या काही दिवसांपासून ही जागा विशेष रुपाने चर्चेत आहे. येथे महायुतीने भावना गवळी यांचे तिकीट कापले आहे.  एकनाथ शिंदे यांनी या जागेवर राजश्री पाटील यांना तिकीट दिले आहे. राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार तथा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. भावना गवळी या गेल्या 25 वर्षांपासून यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळीदेखील मलाच तिकीट मिळेल, असा विश्वास गवळी यांनी व्यक्त केला होता. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्त कट करण्यात आला. त्यांना शिंदे यांनी तिकीट नाकारले आहे.

आता नेमकं काय होणार?

महायुतीने येथे नव्या चेहऱ्याला तिकीट दिले आहे. त्यानंतर आता मविआनेही आपला उमेदवार बदलला आहे. या मतदारसंघावर तिहेरी लढत होणार आहे. त्यामुळे आता या जागेवर नेमकं कोण बाजी मारहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी या दोन्ही गटांत अनेक बैठका झाल्या. मात्र या बैठकीतून काहीही ठोस समोर आले नाही. याच कारणामुळे आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयांतर्गत प्रकाश आंबेडकरांनी काही जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत तिहेरी लढत होणार आहे. 

हेही वाचा >>

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी जाहीर होणार; माढा, बीड, साताऱ्यातून कोणाला संधी?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts