What is the wealth of Shiv Sena Thackeray group MP Sanjay Jadhav from Parbhani Election Parbhani loksabha election 2024 mahadev jankar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Jadhav Parbhani: सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु झालाय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीचं विवरण देणं गरजेचं आहे. परभणी लोकसभा (Parbhani Loksabha) मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी देखील आपल्या संपत्तीचं विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केलंय. परभणीत महायुतीचे उमेदावर महादेव जाणकरांना ते टक्कर देणार आहेत. जाणून घेऊयात संजय जाधव यांच्या संपत्तीबद्दल सविस्तर माहिती. 

6 कोटी 17 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता

परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे संपत्तीत महादेव जानकर यांच्या पुढे आहेत. संजय जाधव हे व्यवसायाने शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. संजय जाधव यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या संपत्तीच्या विवरणात त्यांच्याकडे जवळपास 6 कोटी 17 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्या नावावर देखील जवळपास चार कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. असे असले तरी संजय जाधव यांच्यावर तीन कोटी 39 लाख तर त्यांच्या पत्नी यांच्या नावावर एक कोटी 35 लाख रुपयाचे कर्ज देखील आहे.

कोणत्या वर्षी किती संपत्ती?

संजय जाधव यांनी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या वतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाला शपथपत्राद्वारे दिले आहे. या शपथपत्रांमध्ये संजय जाधव यांचे वार्षिक उत्पन्न सन 2022-23 मध्ये 48 लाख 37 हजार 689 रुपये, 2021-22 मध्ये 43 लाख 62 हजार 659 रुपये, 2020-21 मध्ये 28 लाख 95 हजार 358 रुपये, 2019-20 मध्ये 24 लाख 50 हजार 464 रुपये एवढे असून त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांचे सन 2022-23 मध्ये 32 लाख 48 हजार 756 रुपये, सन 2021-22 मध्ये 31 लाख 56 हजार 605 रुपये, सन 2020-2021 मध्ये 31 लाख 62 हजार 480 रुपये तर सन 2019-2020 मध्ये 12 लाख 83 हजार 315 रुपये एवढे दाखवण्यात आले आहे.

रोख रक्कम दहा लाख दोन हजार

खासदार संजय जाधव यांच्याकडे बँकेतील ठेवी, एलआयसी, बोंड, शेअर्स, सोने अशी जंगम मालमत्ता एक कोटी 92 लाख 57 हजार,173 रुपयांची आहे. तर त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्याकडे एक कोटी 50 लाख 19 हजार 364 रुपयांची आहे. संजय जाधव यांच्या हातातील रोख रक्कम दहा लाख दोन हजार रुपये असून त्यांच्या पत्नीकडे सात लाख पंधरा हजार दोनशे बारा रुपये एवढी आहे.

संजय जाधव यांच्यावर बँकांचे कर्ज 

संजय जाधव यांच्याकडे स्थावर मालमत्तेमध्ये त्यांच्या नावावर परभणी जिल्ह्यात जवळपास 13 एकर शेत जमीन आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावावर 21 एकर शेत जमीन आहे. संजय जाधव यांच्या नावावर परभणी शहरात तीन प्लॉट असून पुणे खराडी येथे गृहनिर्माण संस्थेत एक फ्लॅट आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी क्रांती जाधव यांच्या नावावरही परभणी शहरात दोन प्लॉट आहेत. पण संजय जाधव यांच्या नावावर कसलीही वाणिज्य इमारत नाही. संजय जाधव यांचे उत्पन्न आणि असणारी मालमत्ता जास्त असली तरी त्यांच्या नावावर कर्जाचा डोंगर ह तसाच आहे. संजय जाधव यांच्या नावावर एसबीआय बँकेचे चार लाख चोवीस हजाराचे लोन आहे तसेच कार लोन देखील सहा लाख 71 हजार रुपयांचे आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे होम लोन दोन कोटी 17 लाख 57 हजार रुपय एवढे आहे. संजय जाधव यांच्या नावावर एकूण कर्ज तीन कोटी 39 लाख 50 हजार 691 रुपये एवढे आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीक्रांती जाधव यांच्या नावावर देखील एक कोटी 35 लाख 44 हजार 650 रुपये कर्ज आहे.

संजय जाधव यांच्यावर सहा गुन्हे 

संजय जाधव यांच्यावर तब्बल सहा गुन्हे दाखल आहेत. पण हे सर्व गुन्हे सार्वजनिक कार्यक्रमात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी लोकांना एकत्रित करून निदर्शने केली म्हणून, तर स्वागतासाठी डीजे फटाके रॅली विनापरवानगी काढली म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना तात्काळ डीपी मिळावा यासाठी महावितरण कार्यालयावर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रेल्वे ग्रुप बुकिंग लॉबी स्थलांतर विरोधी आंदोलन पूर्णा रेल्वे स्थानकात अनाधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा पैकी पाच गुन्ह्मध्ये दोषारोप ठेवण्यात आलेला आहे.

महत्वाच्या बातम्या:

 संजय जाधव, विटेकर, बोर्डीकर इच्छुकांची यादी काही संपेना; परभणी मतदार संघावर कोण वर्चस्व गाजवणार?

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts