Sanjay Raut Exclusive When will Raj Thackeray and Uddhav Thackeray come together MNS Shiv Sena Alliance ABP Majha Tondi Pariksha Show Maharashra Politcle Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Exclusive on ABP Majha : मुंबई : ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गेल्या काही वर्षात अनेक नवे मित्र केले, वंचितसोबतही आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) केली, अशातच मनसेला (MNS) सोबत घेण्याचा विचार कधी नाही का आला? याबाबत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उत्तर दिलं. महाराष्ट्रातील (Maharashtra News) जनतेच्या मनात दोन ठाकरेंनी एकत्र यावं असंच आहे, यावरही संजय राऊतांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात बोलताना भाष्य केलं. ठाकरे बंधू अजुनही एकत्रच आहे, पण त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच, पूर्वी शिवसेनेतील काही जणांनी मनसेला एकत्र घेण्याबाबत विषय काढला होता, पण ज्यांनी विषय काढला, तेच आता पक्ष सोडून गेलेत, असं संजय राऊत म्हणाले. 

मनसेसोबत जावं असं कधीच वाटलं नाही? संजय राऊत म्हणाले… 

महाविकास आघाडीनं अनेक नवनवीन मित्र, नवे पक्ष आपल्यासोबत जोडून घेतले. उद्धव ठाकरेंनी तर वंचितसोबतही आघाडी केली. पण असा कधी विचार तुमच्या मनात आला नाही का, की मनसेसोबत जोडून घ्यावं? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अशी कधी चर्चा आमच्यात झाली नाही. काहीजणांनी याबाबत विषय काढला होता. पण ज्यांनी विषय काढला तेच आता पक्ष सोडून गेले. 

नजिकच्या काळात दोन्ही ठाकरे एकत्र येतील, संजय राऊत म्हणाले… 

महाराष्ट्रात अनेकांची अशी इच्छा आहे की, दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, तुम्हाला अशी शक्यता दिसतेय का? दोन्ही ठाकरे नजिकच्या काळात एकत्र येतील? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “दोन भाऊ आहे ते शेवटी, दोन भाऊ एकत्रच आहेत, फक्त राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब आणि भाऊ म्हणून ते दोघं एकत्र आहेतच. आम्हीही दोघांशी संबंध ठेवतो, त्यात काही. महाराष्ट्र दिलदार आहे.” 

फक्त 8 दिवसांसाठीत माझ्याकडे ईडी, सीबीआय द्या : संजय राऊत 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “मी कधीच मंत्रिपदाचा विचार केला नाही. इतकी वर्ष मी दिल्लीत आहे, पण मंत्रिपदाचा विचार कधीच केला नाही. पण मला नक्कीच आट दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही जी खाती आहे, त्यांचा कंट्रोल माझ्यासाठी असावा, फक्त आठ दिवसासाठी, एवढंच मला वाटतं. मला दाखवायचंय ही खाती कशी चालतात.”

पाहा व्हिडीओ : Tondi Pariksha Sanjay Raut On MNS : ठाकरे भाऊ एकत्रच आहे, फक्त त्याचा राजकीय मार्ग वेगळा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ईडी आणि सीबीआय 8 दिवसांसाठी माझ्याकडे द्या, मग दाखवतो; तोंडी परीक्षा कार्यक्रमात संजय राऊत कडाडले!

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts