‘जे देशद्रोह्यांसोबत नाचतात, त्यांच्याबद्दल काय बोलणार’, हेमंत गोडसेंचा सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hemant Godse : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची धाकधूक वाढली असून त्यांनी तीन वेळेस मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. मात्र अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही.  

तर महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा ठाकरे गटात येण्यासाठी प्रयत्नात होते. मात्र गद्दारांना पुन्हा संधी नाही, दिल्या घरी सुखी राहा, असे आपण गोडसेंच्या समर्थकांना सांगितल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सिन्नर येथील मेळाव्यात केला होता. 

जे देशद्रोह्यासोबत नाचतात, त्यांच्याबद्दल काय बोलणार

या आरोपावर खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण सुधाकर बडगुजर, चांगल्या माणसाबद्दल विचारले असते तर चालले असते. जे देशद्रोह्यासोबत नाचतात. त्यांच्याबद्दल काय बोलणार, असे म्हणत हेमंत गोडसे यांनी सुधाकर बगुजर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

गोडसेंची वाट खडतर

दरम्यान, सध्या नाशिकचे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. शिवसेना शिंदे गट भाजपच्या दबावाखाली आल्याने नाशिकची जागा जाहीर होत नसल्याची भावना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. तथाकथीत अहवाल पुढे करुन भाजप खा. गोडसे यांना थांबवण्याचे षडयंत्र रचत असल्याची शंका गोडसे समर्थकांना आहे. लोकसभेची हॅट्रीक करण्यासाठी खा. गोडसे कमालीची उत्सुक होते, मात्र त्यांच्या मार्गात गतिरोधके असल्याने त्यांची वाट खडतर झाली आहे. 

नाशिक लोकसभेत महायुतीची ताकद अधिक

दरम्यान, नाशिक लोकसभेतील विधानसभानिहाय मतदारसंघाचा विचार केल्यास या लोकसभेच्या मतदारसंघात नाशिक पश्चिम, मध्य, पूर्व, देवळाली, सिन्नर व इगतपूरी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी इगतपुरीत काँग्रेसचा एक आमदार वगळता उर्वरीत पाचही विधानसभेत महायुतीचे आमदार आहे. तीन भाजप व दोन अजित पवार गटाचे आमदार असल्याने नाशिक लोकसभेत महायुतीची ताकद अधिक दिसते.

आणखी वाचा 

शिंदेंच्या शिवसेनेतील अनेकांचे परतीसाठी फोन, संजय राऊतांचा ‘तोंडी परीक्षेत’ मोठा दावा

अधिक पाहा..

Related posts