ipl 2024 gt vs pbks wridhiman saha mohit sharma david miller punjab connection raised tension of shikhar dhawan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

GT vs PBKS अहमदाबाद : गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आयपीएलची 17 वी मॅच पार पडणार आहे. आयपीएलमध्ये (IPL 2024) शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्स आणि शिखर धवनच्या नेतृत्त्वातील पंजाब किंग्ज आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने येतील. गुजरात गुणतालिकेत सध्या पाचव्या स्थानावर असून पंजाबचा संघ सातव्या स्थानी आहे. शुभमन गिलसह गुजरातची टीम आयपीएलमधील तिसऱ्या विजयासाठी तर पंजाब दुसऱ्या विजयाच्या उद्देशानं मैदानात उतरतील. एकेकाळी पंजाब किंग्जकडून खेळलेले काही क्रिकेटपटू आता गुजरात टायटन्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आता तेच खेळाडू शिखर धवनचं टेन्शन वाढवू शकतात. जाणून घेऊया नेमके कोणते तीन खेळाडू आहेत जे पंजाबसमोर आव्हान निर्माण करु शकतात. 

मोहित शर्मा 

एकेकाळी पंजाब किंग्जकडून खेळणारा मोहित शर्मा आता गुजरात टायटन्सचा प्रमुख गोलंदाज आहे. मोहित शर्मानं 2023 च्या आयपीएलमध्ये 14 मॅचमध्ये 27 विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या आयपीएलमध्येही गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा चांगली गोलंदाजी करत आहे. मोहित शर्मा 2016 ते 2018 दरम्यान पंजाब किंग्जकडून खेळत होता. त्यामध्ये त्यानं 37 मॅचमध्ये 9.19 च्या इकोनॉमीनं 33 विकेट घेतल्या होत्या. 

डेव्हिड मिलर

एकेकाळी पंजाबकडून खेळणारा आणि आज त्यांच्या विरुद्ध उभा राहणारा खेळाडू डेव्हिड मिलर आहे. डेव्हिड मिलर 2012 ते 2019 या सात वर्षांच्या कालावधीत पंजाबच्या टीमसोबत होता. त्यानं 84 मॅचेसमध्ये  पंजाबसाठी 1974 धावा केल्या होत्या. त्याचं पंजाबकडून खेळताना स्ट्राइक रेट 139.40 इतकं होतं. मिलरला 2022 च्या आयपीएलच्या ऑक्शनमध्ये 3 कोटींमध्ये गुजरात टायटन्सनं संघात घेतलं होतं. गुजरातसाठी त्यानं 16 मॅचमध्ये 481 धावा केल्या होत्या. त्याचं स्ट्राईक रेट 142.73 इतकं होतं.

रिद्धिमान साहा

रिद्धिमान साहा 2014 ते 2017 या तीन वर्षांच्या काळात पंजाब किंग्जकडे होता. पंजाबसाठी खेळताना त्यानं 115 धावांची खेळी केली होती. साहानं पंजाबकडून 62 मॅचेस खेळल्या त्यामध्ये त्यानं 1190 धावा केल्या. साहा गुजरात टायटन्सकडून खेळत आहे.2022 पासून साहा गुजरातचा सलामीवीर म्हणून खेळतोय. साहानं 31 मॅचेसमध्ये 753 धावा केल्या आहेत.

पंजाब किंग्ज विजयाच्या मार्गावर परतणार 

यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जनं विजयानं सुरुवात केली होती. पंजाबनं पहिल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं होतं. मात्र, त्यानंतर झालेल्या दोन मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता शिखर धवनच्या नेतृत्त्वातील पंजाब विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. दुसरीकडे गुजरात टायटन्स देखील होमग्राऊंडवर विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. 

संबंधित बातम्या :
 IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग तीन मॅचमध्ये पराभव, रोहितच्या संघानं चार मॅच गमावल्यानंतरही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलेलं

‘आमच्या संघातील खेळाडू ‘सुस्त मुर्गे”; IPL आणि आगामी विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा काय म्हणाला?
 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts