ipl 2024 gt vs pbks toss update shikhar dhawan won the toss elected bowl first against gujarat titans

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : आयपीएलच्या 17 (IPL 2024)  व्या मॅचमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) आमने सामने येत आहेत. गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्स विरुद्ध विजयानं यंदाच्या आयपीएलची सुरुवात केली होती.  गुजरातनं आतापर्यंत तीन मॅचपैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. पंजाब किंग्ज आज दुसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल. पंजाबचा कॅप्टन शिखर धवन यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 

गुजरातला तिसरा विजय मिळवणार?
गुजरात टायटन्स सध्या गुणतालिकेत चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर शिखर धवनच्या नेतृत्त्वातील पंजाब किंग्ज सातव्या स्थानावर आहे. पंजाबनं होमग्राऊंडच्या बाहेर खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. गुजरातला आजच्या मॅचमध्ये विजय मिळणार का हे पाहावं लागणार आहे. 

गुजरातचा  कर्णधार शुभमन गिल मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेला आहे. शुभमन गिलनं मोठी धावसंख्या उभारल्यास गुजरातला त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरीकडे शिखर धवननं पंजाबसाठी चांगल्या धावा केल्या आहेत. मात्र, शिखर धवनचा स्ट्राइक रेट हा पंजाबसाठी चिंतेचा विषय आहे.  

गुजरात टायटन्सनं होम ग्राऊंडवर आतापर्यंत दोन मॅच जिंकल्या आहेत. पंजाबनं देखील होम ग्राऊंडवर एक मॅच जिंकली आहे. पंजाब किंग्जनं लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी सिकंदर रझाला संधी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्सनं आजच्या मॅचमध्ये डेव्हिड मिलरच्या जागी केन विल्यमन्सनला संधी दिली आहे. 

पंजाबची टीम

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, शशांक सिंग, हर्षल पटेल, हरपीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर 

गुजरातची टीम

शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अजमतुल्ला ओमरझाई, केन विल्यमन्सन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा

दरम्यान,मोहम्मद शमीला पर्याय म्हणून गुजरातनं उमेश यादवला संधी दिली आहे. उमेश यादवचं पंजाब विरुद्ध रेकॉर्ड चांगलं आहे. उमेश यादवनं पंजाब किंग्ज विरुद्ध सहावेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे. आज उमेश यादव त्याच प्रकारची कामगिरी करतो का हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या :

ठरलं! सूर्यकुमार यादव उद्याच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार; दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार?

DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts