Praniti Shinde : मोहिते पाटील मविआत आल्यास फायदाच होणार; प्रणिती शिंदेचा दावा, राम सातपुतेंनाही डिवचलं!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Praniti Shinde : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे जर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येत असतील तर त्याचा फायदाच होणार आहे. संविधान वाचवण्यासाठी जेवढे नेते महाविकास आघाडीत येतील, तेवढ्या राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाढतील, असा दावा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केला. 

आज प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण, धर्मगाव, ढवळस, शरदनगर, देगाव, घरनिकी, मरापूर, महंमदाबाद, गुंजेगाव, लेंडवेचिंचाळी, शिरसी, डोंगरगाव, बठाण अशा १३ गावांचा गावभेट दौरा केला. यावेळी भर उन्हात मोठ्या संख्येने ग्रामस्थ आमदार प्रणिती शिंदे यांच्या भेटीसाठी येत होते. 

तुम्ही गेल्या १० वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा द्या

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आपण फक्त पहिल्यापासून विकासाच्या मुद्यावरच बोलत होतो आणि विरोधकांनाही आपण केवळ विकासावर बोलण्याची विनंती केली होती. मात्र तेच इथे तिथे नको त्या मुद्द्यांवर प्रचार घेऊन जायची गरज नाही. तुम्ही गेल्या १० वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा द्या असे सांगितले असल्याचा टोला भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना लगावला. 

सोलापूरला आयटी सिटी बनवायचंय

गावोगावी शेतकरी अतिशय नाराज असून त्यांना सर्वच पातळीवर या सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना असल्याचे प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. गेल्या 10 वर्षात विकासाचा बॅकलॉग राहिला असून सोलापूरची युवकांच्या हाताला रोजगार, शहरात आणि ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न, शिक्षण संस्था आणि नवनवीन उद्योग आणणे हे महत्वाचे प्रश्न असून सोलापूरला आयटी सिटी बनवायचे असल्याचे प्रणिती शिंदेंनी सांगितले. 

लोकशाही वाचवण्यासाठी मोहिते पाटील आले तर मोठा फायदा 

लोकशाही वाचवण्यासाठी मोहिते पाटील आले तर त्यांचा मोठा फायदा सोलापूर लोकसभेसाठी आणि राज्यातील इतर जागांवर होणार असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. प्रत्येक गावात जाऊन स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजावून घेणे आणि त्यांना दिलासा देण्याचे काम सध्या प्रणिती शिंदे करीत आहेत. मंगळवेढा तालुक्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने ग्रामस्थांकडून याच मुद्द्यावर नेत्यांना घेरले जात आहे. सध्या नदीकाठी वीज केवळ दोन तास मिळत असल्याने आपण रोज जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून गरज असेल तिथे पाण्याचे टँकर पाठवणे, वीज पुरवठा कालावधी वाढवणे याबाबत मागणी करीत असल्याचे सांगितले. मात्र सध्या शासन आणि प्रशासनाची इच्छाशक्ती नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

आमचा आणि राष्ट्रवादीचा 20 वर्षांचा संघर्ष, फडणवीसांच्या इंदापूर मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts