anandraj ambedkar slams Prakash Ambedkar VBA party over support from amravati lok sabha constituency

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: अमरावती लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देऊ केला होता. मात्र, हा पाठिंबा म्हणजे निव्वळ दिखाऊगिरी असल्याचा आरोप करत आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी वंचित आघाडीला रोखठोक भाषेत खडे बोल सुनावले. तसेच वंचितचा (VBA) पाठिंबा नाकारत अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. आनंदराज आंबेडकर यांनी एका जाहीर पत्राच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

आनंदराज आंबेडकर यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आपले दि. ०४/०४/२०२४ रोजीचे माझ्या अमरावती मतदारसंघातील उमेदवारीला पाठिंबा असल्याचे पत्र मला सोशल मीडिया च्या माध्यमातून मिळाले. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. परंतु आपल्या सदर पत्रात आपण माझ्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी समर्थन करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार नामांकन दाखल करणार नाही असे आपल्या पक्षाने व अधिकृत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे. हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे.

मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझ्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या नामांकन रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नका अशा फोनद्वारे सूचना वजा ताकीद देण्यात आली होती अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

सदरहू मी तीन दिवस अगोदर पासून वंचित बहुजन आघाडीला पाठिंब्यासाठी पाठवलेल्या पत्रानुसार पाठिंब्याच्या प्रतिक्षेत होतो आणि अखेरीस नाईलाजास्तव संविधान प्रेमी जनतेची पुन्हा एकदा मतविभागणी होऊन भाजपा सरकार येऊ नये म्हणून माझ्या पक्ष संघटनेने निर्णय घेऊन माझी अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि संबंधित पत्र मी दिनांक ०३/०४/२०२४ ला माझ्या आधिकृत फेसबुक पेज वरून प्रसारित केले. आता त्यामध्ये किंचितही बदल होणे शक्य नाही. तेव्हा आपण उशीरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुनःच्छ आपले आभार आणि माझ्याकडून शुभेच्छा.

वंचितला घाई नडली, उमेदवार बदलण्याची वेळ; अमरावतीसाठी आनंदराज आंबेडकारांना खास विनंती

महाविकास आघाडीशी जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर घाईने दिलेले उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आल्याचे दिसत आहे. वंचितच्या उमेदवारापेक्षा वरचढ असलेल्या अपक्षांनी देखील फॉर्म भरल्याने ऐनवेळी त्यांना उमेदवार बदलावे लागले. अमरावती लोकसभा मतदारसंघात आनंदराज आंबेडकर यांना वंचितकडून उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, यासाठी विनंती करण्यात आली आहे. उमेदवारीसाठी वंचितकडून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याचे पत्र लिहित स्पष्ट करण्यात आले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकरांनी  उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आंबेडकरी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी आनंदराज आंबेडकर यांनी सुरु केली होती. त्यावर वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पत्र लिहून अमरावतीमधून उमेदवारी मागे घेऊ नये, अशी विनंती केली होती. त्यामुळे आनंदराज आंबेडकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आनंदराज आंबेडकरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असती तर अमरावतीत तिरंगी लढत झाली असती. 

परभणीत वंचितनं बाबासाहेब उगले यांच्या ऐवजी पंजाबराव डख यांना उमेदवारी देऊ केली आहे. आज वंचितच्या वतीने पंजाबराव डख यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरलाय. तिकडे, रामटेक मतदारसंघात देखील वंचितनं आपला उमेदवार बदलला आहे. अधिकृत उमेदवार असलेल्या शंकर चहांदे यांच्या जागी माजी कांग्रेस नेते किशोर गजभिये यांना समर्थन देण्याची वेळ वंचितवर आली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना एकीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीने आज उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवार बदलला. वंचित बहुजन पक्षाने या आधी सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती आता. मात्र, वंचितकडून युवा उमेदवाराला संधी देण्यात आली असून अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुभाष पवार यांच्या प्रकृती अत्यवस्थेमुळे उमेदवार बदलण्याची वेळ वंचितवर आली होती. 

आणखी वाचा

आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात; नवनीत राणांना कडवी टक्कर?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts