[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्रपती संभाजीनगरात उद्या म्हणजेच १६ सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मात्र मराठवाड्यात आत्तापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोडीत काढणार आहेत. कारण, आतापर्यंत झालेल्या मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी या सरकारी विश्रामगृहातच असायचा.पण, शिंदे हे फोर स्टार हॉटेलात 32 हजार रुपये भाडं असलेल्या आलिशान सूटमध्ये राहणार आहेत. मागील इतिहास पाहिला तर मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सरकारी विश्रामगृहातच होता. पण यंदा चित्र वेगळं असण्याची शक्यता आहे..</p>
<p> </p>
[ad_2]