Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 15th September 2023 Maharashtra Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील… 

Anantnag Encounter : अनंतनागमध्ये सापडला जवानाचा मृतदेह, शहीद जवानांची संख्या आता 4 वर, पोलीसांचा खबरी निघाला देशद्रोही

Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) अत्यंत दु:खद बातमी येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अनंतनागमध्ये आणखी एक जवान शहीद झाला आहे. अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे. येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. वाचा सविस्तर 

IMD Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह ‘या’ राज्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

IMD Weather Update : देशातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा हवामान आल्हाददायक झाले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये चांगला पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज (शुक्रवार 15 सप्टेंबर) रोजी पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सक्रिय होईल, तर पश्चिम भारतातही आजपासूनच पावसाच्या हालचाली दिसून येतील. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागांत आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

Adtiya L1 Mission : आदित्य एल-1 ची पृथ्वीभोवती चौथी प्रदक्षिणा पूर्ण; सूर्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे

ISRO Aditya L1 : भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेअंतर्गत अवकाशात पाठवलेल्या आदित्य L-1 (Aditya L1) अंतराळयानाने चौथा टप्पा ‘अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. भारतीय अंतराळ संस्था ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ (ISRO) ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘अर्थ बाउंड मॅन्युव्हर’ म्हणजे पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे अंतराळात प्रवास करण्यासाठी गती निर्माण करणे. वाचा सविस्तर 

NASA Report: अंतराळात एलियन्सचं अस्तित्व? UFO वर जारी रिपोर्टमध्ये NASAचा धक्कादायक खुलासा

NASA UFO Alien Report: अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं गुरुवारी (14 सप्टेंबर) यूएफओवर आधारित आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. सुमारे एक वर्ष UFO (अन-आयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट) चा अभ्यास केल्यानंतर नासानं हा अहवाल जारी केला आहे. नासाच्या या 33 पानांच्या अहवालात यूएफओ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठं रहस्य असल्याचं वर्णन करण्यात आलं आहे. हा अहवाल प्रसिद्ध करताना अमेरिकन स्पेस एजन्सीचे व्यवस्थापक बिल नेल्सन म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की, पृथ्वीशिवाय विश्वात जीवसृष्टी (एलियन) आहे. वाचा सविस्तर 

Sugar : देशात साडेतीन महिने पुरेल इतका साखरेचा साठा शिल्लक, 2023-24 मध्ये चांगल्या उत्पन्नाची शक्यता 

Sugar : देशात रास्त दरात साखरेची पुरेशी (sugar) उपलब्धता असून, भारतीय साखर ही जगात सर्वात स्वस्त असल्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं (Department of Food and Public Distribution) दिली आहे. ऊस असणाऱ्या  क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडला आहे. यामुळं आगामी साखर हंगाम 2023-24 मध्ये चांगल्या पिकाची तसेच उत्पन्नाची शक्यता असल्याची माहिती देखील अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं दिली आहे. वाचा सविस्तर 

Asia Cup 2023, PAK vs SL: श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, मेंडिस-असलंकाची धमाकेदार खेळी, पाकिस्तानचं आव्हान संपलं

Pakistan vs Sri Lanka Match Highlights: आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka) पाकिस्तानचा (Pakistan) 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी केवळ 42 षटकांत पूर्ण केलं. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसनं फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानंही 49 नाबाद धावा केल्या. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ टीम इंडियाविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत खेळणार आहे. वाचा सविस्तर 

15 September In History :भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले, पहिल्यांदाच झाले दूरदर्शनवरुन प्रसारण; आज इतिहासात

15 September In History : आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी इतिहासामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्याच दिवशी भारतातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक असलेल्या दूरदर्शन वाहिनीवर पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. तसेच भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.  तर बंगाली साहित्यिक आणि  ‘परिणीता’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक  शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म देखील आजच्याच दिवशी झाला होता.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक  के. एस. सुदर्शन यांचे 15 सप्टेंबर रोजी निधन झाले. वाचा सविस्तर 

Horoscope Today 15 September 2023 : वृषभ, सिंहसह ‘या’ राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 15 September 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार, आज मेष राशीचे लोक उद्या आपल्या घरात शांततेसाठी काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकतात, वृषभ राशीच्या लोकांना उद्या पुढे जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. इतर राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? चला जाणून घेऊया उद्याची राशीभविष्य, वाचा सविस्तर

Related posts