लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे ‘अश्लील कृत्य’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील (Spain) असल्याचे समोर आलं आहे. स्पेनमधील माद्रिदमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला (female journalist) एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. महिला पत्रकार वार्ताकन करत असतानाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली होती. व्हिडीओ (Viral Video) समोर येताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, पत्रकार इसा बालाडो या कुआट्रो चॅनलसाठी माद्रिदमध्ये लुटमारीचे लाइव्ह रिपोर्टिंग करत होत्या. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मागून पत्रकाराच्या अंगाला अयोग्यरित्या स्पर्श केला. त्यानंतर त्याने तू कुठल्या चॅनेलवर काम करते असे विचारले. मात्र लाईव्ह रिपोर्टिंग सुरु असल्याने पत्रकाराने त्याकडे दुर्लक्ष केले आपले वार्तांकन सुरूच ठेवले. दुसरीकडे, शोचे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. त्यांनी आश्चर्य करत तुझ्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल मला माफ कर, पण त्याने तुझ्या पार्श्वभागाला हात लावला का?, असा सवाल केला. त्यानंतर महिला पत्रकाराने हो असे उत्तर दिलं.

त्यानंतर सूत्रसंचालन करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर आण असे पत्रकार इसा बालाडोला सांगितले. “कृपया तू त्या माणसाला माझ्यासमोर आणू शकते का? त्या मूर्ख माणसाला माझ्यासमोर उभे कर, असे सूत्रसंचालकाने सांगितले.  यानंतर इसा बालाडो आरोपीला म्हणाला की, तुम्हाला विचारायचे आहे की आम्ही कोणत्या चॅनेलची आहे? तू माझ्या नितंबाला स्पर्श केलास? मी लाइव्ह शो करत आहे आणि काम करत आहे. त्यावर मात्र त्या व्यक्तीने आपण काही चुकीचे केले म्हटलं आणि पार्श्वभागाला स्पर्श केला नाही असे म्हटलं. त्यानंतर तो तिच्या केसांना स्पर्श करून निघून गेला. काही सेकंदांनंतर, पुन्हा तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला की तू खरं सांगायला हवं.

या घटनेचा व्हिडिओ स्टीफन सिमानोविट्झ नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट केला आहे. पत्रकार इसा बालाडो माद्रिदमध्ये रिपोर्टिंग करत होती. तेव्हा मागून एक व्यक्ती आला आणि तिचा विनयभंग करू लागला. त्याने तिला मागून पकडले. यानंतर पोलीस विभागाने सिमानोविट्झ यांच्या ट्विटला उत्तर दिले, असे व्हिडिओ शेअर करताना सिमानोविट्झने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आरोपी कॅमेऱ्यालाही घाबरत नसल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. आरोपी आरामात येतो आणि रिपोर्टरला स्पर्श करू लागतो. यानंतर तो तिला विचारतो की ती कोणत्या चॅनलसाठी काम करते.

पोलिसांनी आरोपीला केली अटक

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी छेडछाड करणाऱ्याला अटक केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन पोलीस अधिकारी त्याला पकडून घेऊन जात आहेत.

Related posts