Ambarnath News : विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, अंबरनाथ येथील घटना

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ambarnath News : अंबरनाथ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज (दि. 04) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ (Ambarnath) येथील जांभूळ गावात पाण्याच्या टाकीच्या उभारणीचे काम सुरु होते. टाकीचे काम करीत असताना त्या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावण्यात आला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार तो पंप पुन्हा सुरू करण्यासाठी गेले होते. 

विजेचा शॉक लागून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

त्यातील तिघा कामगारांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र पंपाचा विजेचा पुरवठा सुरूच राहिल्याने या पंपाचा तीन कामगारांना शॉक (Electric Shock) बसला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुलशन मंडल, राजन मंडल, शालिग्राम मंडल अशी मृत कामगारांची नावे आहेत. 

एक कामगार गंभीर जखमी, दोन बचावले

या ठिकाणी असलेला एक कामगार गंभीर जखमी झाला. उर्वरित दोघा कामगारांनी पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली असून त्यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अकोल्यात जमिनीच्या वादातून एकाची हत्या

जमिनीच्या वादातून एकाची गाढ झोपेत असतानाच लाठीकाठी आणि कुर्हाडीनं वार करून निर्घृणपणे हत्या (Crime) करण्यात आली. ही धक्कादायक घटना अकोला (Akola Crime News) जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या बटवाडी गावात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बटवाडी गावातील सरकारी जागेवरील ताब्यावरुन तीन कुटुंबीयामध्ये वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद  31 मार्चच्या रात्री अचानक उफाळून आला.  कालांतराने हा वाद इतका विकोपाला गेला की, रात्री साडेअकरा पर्यंत शाब्दिक वाद सुरू होता आणि मध्यरात्रीनंतर दुसऱ्या कुटुंबातील काहींनी आखरे कुटुंबातील एकावर प्राणघातक हल्ला करत त्याला संपवलं. या प्रकरणाची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी (Akola Police) तात्काळ घटनास्थाळ गाठत आतापर्यंत दहा लोकांना ताब्यात घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या

माफी मागतो आणि आता तोडीबाज म्हणतो एवढा लाचार माणूस हिंदुस्तानात सापडणार का? बच्चू कडूंचा रवी राणांवर ‘प्रहार’!

Anandraj Ambedkar: आनंदराज आंबेडकरांनी वंचितला रोखठोक भाषेत सुनावलं, पाठिंबा धुडकावत अमरावती लोकसभेच्या रिंगणातून माघार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts