ipl 2024 gt vs pbks gujarat titans set target of 200 runs against punjab kings due to batting of shubman gill

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : आयपीएलमध्ये (IPL 2024) पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात  17 वी मॅच सुरु आहे. पंजाबनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. शिखर धवनचा (Shikhar Dhawan) हा निर्णय पंजाबच्या बॉलर्सनी सार्थ ठरवला. पंजाब किंग्जनं गुजरातला पहिल्या 10 ओव्हर्समध्ये मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. गुजरातचा संघ पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 2 बाद 83 धावा करु शकला.पंजाबच्या बॉलर्सला शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन यांनी संयमी फलंदाजी करत उत्तर दिलं. शुभमन गिलच्या 89 दमदार खेळीच्या जोरावर गुजरातनं 20 ओव्हर्समध्ये 199 धावा करत पंजाब समोर विजयासाठी 200 धावांचं आव्हान ठेवलं.

रिद्धिमान साहा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी 

पंजाबकडून शिखर धवननं पहिली ओव्हर स्पिनर हरप्रीत ब्रार याला दिली. ब्रार, अर्शदीप आणि रबाडा यांनी चांगली सुरुवात करुन देत गुजरातला सुरुवातीला मोठे फटके मारु दिले नाहीत. कगिसो रबाडानं रिद्धिमान साहाला 11 धावांवर बाद केलं. आज देखील साहा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.  डेव्हिड मिलरच्या जागी संधी मिळालेल्या केन विलियम्सननं 26 धावांची खेळी केली. यानंतर  साई सुदर्शन आणि शुभमन गिलनं गुजरातचा डाव सावरला. साई सुदर्शननं 33 धावा केल्या. तर, राहुल तेवतियानं 23 धावा केल्या. 

पंजाबच्या गोलदाजांनी गुजरातच्या टॉप आर्डरला रोखलं 

टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा शिखर धवनचा निर्णय पंजाबच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पंजाब किंग्जच्या ब्रार, रबाडा आणि  अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, सिंकदर रजा, सॅम करन यांनी गुजरातच्या टॉप ऑर्डरला मोठे फटके मारू दिले नाहीत. रिद्धिमान साहा, केन विलियमन्सन, साई सुदर्शन यांना सिक्स मारु दिले नाहीत.  गुजरातच्या टॉप ऑर्डरपैकी शुभमन गिलनं चार सिक्स मारले. 

शुभमन गिलनं डाव सावरला

शुभमन गिलनं अर्धशतक करत डाव सावरला. एकीकडून नियमित अंतरानं विकेट पडत असताना शुभमन गिल मैदानावर पाय रोवून उभा होता. शुभमन गिलनं त्याच्या डावाची सुरुवात सिक्स मारुन केली.  गुजरातनं पहिल्या 6 ओव्हरमध्ये 52, 7 ते  15 ओव्हरमध्ये 82 धावा केल्या तर  16 ते 20 ओव्हरमध्ये गुजरातनं  65 धावा केल्या. शुभमन गिलनं 89 धावांची खेळी केली. 

संबंधित बातम्या : 

IPL 2024, GT vs PBKS Toss Update : शिखर धवननं टॉस जिंकला, पंजाब पहिल्यांदा बॉलिंग करत गुजरातला रोखणार

IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग तीन मॅचमध्ये पराभव, रोहितच्या संघानं चार मॅच गमावल्यानंतरही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलेलं

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts