Bhiwandi Suresh Mhatre: कोण आहेत सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhiwandi Suresh Mhatre: कोण आहेत सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे ? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीमधील उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची सर्व पक्षांत सहज संचार करणारे राजकीय नेते अशी मतदारसंघात ओळख आहे. बाळ्यामामा हे मूळचे शिवसैनिक. पण आजच्या जमान्यात ते पक्षांतरासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा वेळा पक्ष बदलले आहेत. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (शिंदे गट) असा संचार करून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. हे त्यांचं सातवं पक्षांतर असल्याचं सांगण्यात येतं. २०१४ साली बाळ्यामामांनी मनसेकडून भिवंडी लोकसभेची निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ साली शिवसेनेत असतांनाही त्यांनी युतीचे उमेदवार असलेल्या कपिल पाटलांना जाहीर विरोध केला होता. तेव्हापासूनच भिवंडीत सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात राजकीय वाद दिसून आला.</p>

[ad_2]

Related posts