GT vs PBKS: A player can only perform when he is given a chance, said Punjab player Shashank Singh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

GT vs PBKS Shashank Singh: रोमांचक झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) थरारक विजय मिळवताना गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) आव्हान 3 गड्यांनी परतावले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरातने 20 षटकांत 4 बाद 199 धावा केल्यानंतर पंजाबने 19.5 षटकांत 7 बाद 200 धावा करत दमदार विजय मिळवला. शशांक सिंगने नाबाद अर्धशतक झळकावत सामन्याचे चित्र पालटत पंजाबला विजयी केले.

पंजाब किंग्सकडून 61 धावांची खेळी करणाऱ्या शशांक सिंगला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. शशांक सिंगनं 29 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. शशांकनं 210 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. शशांकनं 3 षटकार आणि चार चौकार लगावत 61 धावा केल्या. शशांक सिंगच्या या आक्रमक खेळीमुळे पंजाबचा विजय निश्चित झाला. या सामन्यानंतर शशांक सिंगच्या विधानाची सध्या चर्चा सुरु आहे. 

सामन्यानंतर शशांक सिंग काय म्हणाला?

शशांक सिंगने सांगितले की, सामना संपवण्याचा सराव केल्यानंतर तो प्रत्यक्षात साकारताना खूप आनंद होत आहे. मी सहसा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु यावेळी पंजाब संघाने मला 5 व्या क्रमांकावर मैदानात उतरवले. मला यापूर्वी अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. शशांक सिंगने स्पष्टपणे सांगितले की, खेळाडू तेव्हाच कामगिरी करू शकतो जेव्हा त्याच्यावर विश्वास दाखवला जातो आणि त्याला संधी दिली जाते. सनरायझर्स हैदराबादने त्याला 2022 मध्ये खेळण्यासाठी जास्त संधी दिली नव्हती.

मी नाव नाही, चेंडू पाहतो-

शशांक सिंगने राशिद खानसारख्या गोलंदाजालाही झोडपून काढले. याबाबत शशांकला विचारले असता त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो गोलंदाजाचा चेंडू पाहतो, त्याचे नाव नाही. शशांक सिंगने गुजरात टायटन्सविरुद्धही तेच केले. या खेळाडूने मधल्या फळीत सिकंदर रझासह 22 चेंडूत 41 धावा जोडल्या. जितेश शर्मासोबत त्याने 19 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली आणि आशुतोष शर्मासोबत या खेळाडूने 22 चेंडूत 43 धावांची भर घातली. या भागीदारींच्या जोरावरच पंजाबला रोमहर्षक विजय मिळाला.

कोण आहे शशांक सिंग?

शशांक सिंग हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे. शशांक सिंग गोलंदाजी देखील करु शकतो. आयपीएलच्या मिनी ऑक्शनच्या वेळी शशांक सिंगला संधी देण्यात कुठल्याही फ्रँचायजीनं पुढाकार घेतला नव्हता. पंजाब किंग्सनं शशांक सिंगला संघात घेतलं होतं मात्र काही कारणांमुळं त्यांना आपण चुकीच्या खेळाडूला संघात घेतल्याचं वाटलं होतं. काही काळानंतर गैरसमज दूर झाले आणि पंजाबनं शशांक सिंगला संघात घेतल्याचं जाहीर केलं होतं. 

संबंधित बातम्या-

IPL 2024 Latest Points Table: पंजाबला विजयाचा फायदा, गुजरातचा खेळ बिघडला; पाहा आयपीएलचे Latest Points Table

पंजाबने गुजरातच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; शेवटच्या षटकांत थरार, नेमकं काय घडलं?

हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts