ipl 2024 mumbai indians captain hardik pandya reached to somanath temple

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hardik Pandya Somnath Temple अहमदाबाद : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलची (IPL 2024) सुरुवात समाधानकारक झालेली नाही. मुंबईच्या टीमला पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावे लागले आहेत. मुंबईला एकही विजय न मिळवता आल्यानं  ते गुणतालिकेत सध्या दहाव्या स्थानी आहेत. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये एक मोठा बदल केला. रोहित शर्माच्या जागी मुंबईचं कप्तानपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आलं आहे. हार्दिकला देखील यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्या गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दाखल झाला. 

मुंबई इंडियन्सची तिसरी मॅच राजस्थान रॉयल्स विरुद्ध 1 एप्रिल रोजी झाली होती. त्या मॅचमध्ये मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर मुंबईची मॅच थेट 7 एप्रिलला होणार आहे. या दरम्यानच्या काळात मुंबईची टीम जामनगरला ट्रीपला गेली असल्याचं समोर आलं होतं. या दरम्यान हार्दिक पांड्या सोमनाथ मंदिरात दाखल झाला आणि त्यानं मंदिरात पूजा अर्चा केली.  

रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला मुंबईचं कप्तान केल्यानंतर सोशल मीडियावरुन पांड्याला मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आली. नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलं. मुंबईला सलग तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. 

मुंबई इंडियन्सची पुढील मॅच रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत  7 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. या मॅचपूर्वी हार्दिक पांड्या सोमनाथ मंदिरात दाखल झाला  आणि त्यानं पूजा अर्चा केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.  

मुंबई पलटवार करणार? 

आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात पहिल्या विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुंबईला गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.  मुंबई इंडियन्सच्या पुढील तीन मॅचेस होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 7 एप्रिलला मुंबईची मॅच असेल. याशिवाय मुंबई इंडियन्स होमग्राऊंडवर 11 एप्रिलला आरसीबी आणि 14 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध खेळेल. मुंबईला पुढील मॅचेस जिंकून आयपीएलमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे.

सूर्यकुमार यादवचं कमबॅक 

मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज आणि टी 20 क्रिकेटमधील जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवचं कमबॅक झालं आहे. आता सूर्यकुमार यादव दुखापतीतून बरा होऊन परतल्यानंतर मुंबईची बॅटिंग तगडी झाली आहे. आता सूर्यकुमार यादव संघात आल्यानं हार्दिक पांड्याचं टेन्शन देखील कमी झालं आहे. 

संबंधित बातम्या :

IPL 2024, Shashank Singh : पंजाबला विजय मिळवून देणाऱ्या शशांक सिंगबाबत शिखर धवनसह इतरांची मोठी चूक, काय घडलं पाहा

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचे मुंबई इंडियन्सने केले खास स्वागत; व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts