ipl 2024 srh vs csk mayank agarwal ruled out due to illness in match against csk said by cummins

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

SRH vs CSK हैदराबाद:आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मॅचला सुरुवात झाली आहे. हैदराबादचा कॅप्टनं पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादच्या संघात आज मयंक अग्रवाल खेळणार नाही अशी माहिती कमिन्सनं दिली.  टी. नटराजननं हैदराबादच्या संघात पुनरागमन केलं. तर, मयंक अगरवाल देखील आज संघाबाहेर आहे. 

मयंक अगरवाल टीमच्या बाहेर का गेला?

पॅट कमिन्सनं दिलेल्या माहितीनुसार मयंग अगरवाल आजारी आहे. दुसरीकडे यंदाच्या आयपीएलमध्ये मयंक अगरवाल चांगली कामगिरी करु शकलेला नाही. मात्र, हैदराबादला मयंक सारख्या फलंदाजाची टॉप ऑर्डरला आवश्यकता आहे.  

मयंक अगरवालनं यंदाच्या आयपीएलमध्ये 32, 11  आणि 16 धावा केल्या आहेत. मयंकला यंदा मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. आजच्या मॅचमधून घेतलेला ब्रेक मयंकसाठी फायदेशीर ठरणार का हे पाहावं लागेल.  

पॅट कमिन्सनं मयंक अगरवाल याच्या जागी ऑलराऊंडर नितीश रेड्डीला संधी दिली आहे. रेडेडीला आयपीएलच्या ऑक्शनमध्ये हैदराबादनं 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. नितीशनं यापूर्वीच्या हंगामात दोन मॅच खेळल्या होत्या. त्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. मयंक अगरवालनं आयपीएलच्या यापूर्वीच्या हंगामात 10 मॅचमध्ये 27 च्या सरासरीनं 270 धावा केल्या आहेत. 

चेन्नईमध्ये कुणाला संधी ?

ऋतुराज गायकवाड यानं टॉसवेळी आमची  टीम चांगली कामगिरी करत असल्याचं म्हटलं. आमच्यासमोर नवी आव्हनं आहेत. पथिराना दुखापतीमुळं खेळत नसून त्याच्या जागी मोईन अलीला संघात संधी देण्यात आल्याचं ऋतुराज गायकवाडनं सांगितलं. 

सध्या चेन्नई सुपर किंग्ज गुण तालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नईनं यापूर्वी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. आज तिसरी मॅच जिंकून चेन्नईचा गुण तालिकेत वरच्या स्थानावर झेप घेऊ शकते.

सनराजयरर्स हैदराबादला पहिल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सनरायजर्सनं दुसऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला 31 धावांनी पराभूत केलं होतं. मात्र, तिसऱ्या मॅचमध्ये गुजरातकडून त्यांचा 7 विकेटनं पराभव झाला होता. 

चेन्नईची सावध सुरुवात 

हैदराबादनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेत चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. चेन्नईनं डावाची सुरुवात सावधपणे केली. रचिन रवींद्र आज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. तो १२ धावा करुन बाद झाला. भूवनेश्वर कुमारला यंदाच्या आयीपएलमध्ये पहिली विकेट मिळाली. होम ग्राऊंडवर हैदराबाद पुन्हा विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. 

संबंधित बातम्या : 

IPL 2024, CSK vs SRH : मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला, चेन्नई तरीही टेन्शन फ्री, जाणून घ्या कारण

 Video: मुंबईचे सलग तीन पराभव, हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात पूजा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts