[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : नाव मोठं लक्षण खोटं… अशी मराठीत म्हण आहे. आयपीएलमधील अनेक क्रिकेटपटूंना ही म्हण चपखल बसते. फ्रँचाइजी कायम खेळाडूची ब्रँड व्हॅल्यू आणि प्रतिमा बघून लिलावात अंधाधुंद बोली लावतात. संघांमधील स्पर्धेचा फायदा विदेशी खेळाडूंना होतो. ज्यांच्यात ना खेळण्याची उर्मी दिसते ना भारतात राहण्याची धैर्य. असाच एक खेळाडू कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईच्या चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केला होता. जो स्पर्धेच्या मध्येच आयपीएल सोडून गेला. आणि आता त्याचा १ रन टीमला कोट्यवधींहून अधिक महाग पडला.पाण्यात गेले १६.२५ कोटी रुपये
हा खेळाडू आहे बेन स्टोक्स. चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) इंग्लंडच्या या कसोटी संघाच्या कर्णधाराला १६.२५ कोटी रुपये इतकी अवाढव्य रक्कम मोजून आपल्या संघात घेतलं होतं. आयपीएलच्या १६व्या सीजनसाठी डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या मिनी आयपीएलच्या लिलावात स्टोक्ससाठी सीएसके आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मोठी काट्याची टक्कर झाली होती. दोन कोटी रुपयांची बेस प्राइस असलेल्या स्टोक्सला १६.२५ कोटी रुपयांची बोली लावत सीएसकेने संघात घेतलं. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून त्याला सीएसकेने त्याच्यावर बोली लावली, अशी चर्चा त्यावेळी होती. पण खराब फिटनेसमुळे ही असं काही झालं घडलं नाही.

असा पडला एक कोटीचा १ रन
अशातच ३१ वर्षीय इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा शेवटचा लीग सामना खेळून मायदेशी परतणार आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी तयारी करण्याकरता बेन स्टोक्स परतणार आहे. बेन स्टोक्सने आयपीएलच्या या हंगामात फक्त दोन सामने खेळले. त्यापैकी एका सामन्यात ७ आणि दुसऱ्या सामन्यात ८ धावा केल्या. त्याने एक ओवर टाकली आणि त्यात १८ रन दिले. हे पाहता धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला एक रन कोटी रुपयांहून अधिक महागात पडला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका १६ जूनपासून सुरू होत आहे. अॅशेस मालिका जिंकण्यासाठी एक जूनपासून इंग्लंडचा आणि आयर्लंडमध्ये लॉर्ड्समध्ये एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.
[ad_2]