[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लखनौ : नशिब हे किती वाईट असू शकतं, याचा प्रत्यय लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याला आला. कारण कृणाल हा ४९ धावांवर खेळत होता. फक्त एकच चेंडू त्याला अर्धशतकासाठी हवा होता. कृणाल आता अर्धशतक पूर्ण करणार असे वाटत होते. पण बाद न होताही त्याच्यावर मैदानाबाहेर जाण्याची वेळ आली. त्यामुळे त्याचे अर्धशतक तर हुकलेच पण आता तो यानंतर खेळणार की नाही, याबाबतही संदिग्धता आहे.ही गोष्ट घडली ती १६ व्या षटकात. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज कॅमेरून ग्रीन गोलंदाजी करत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ही गोष्ट पाहायला मिळाली. ग्रीनने यावेळी चेंडू टाकला आणि त्यावर मोठा फटका मारण्यासाठी लखनौचा मार्कस स्टॉयनिस तयार होता. पण यावेळी त्याचे टायमिंग चुकले आणि त्याला मोठा फटका मारता आला नाही. हा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेला. त्यावेळी चोरटी धाव आपण घेऊ शकतो असे कृणालला वाटले होते. त्यामुळे तो धावत गेला होता. पण यावेळी मार्कसने त्याला थांबवले आणि त्याला माघारी जायला सांगितले. त्यावेळी कृणाल हा चांगल्याच वेगात होता. त्यामुळे त्याला लगेच माघारी फिरणे जमणारे दिसत नव्हते. पण कृणालने तो प्रयत्न केला आणि त्याचा चांगलाच अंगलट आला. कारण एवढ्या वेगात तो माघारी फिरण्याचा प्रयत्न करत होता. पण ही गोष्ट त्याला जमली नाही आणि त्याला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की डॉक्टरांनी थेट मैदानात धाव घेतली. त्यावेळी लखनौचा गौतम गंभीरही मैदानात आला. पण कृणालला चालताही येत नव्हते. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय नेण्यात आला. कृणालला त्यानंतर डगआऊटमध्ये नेण्यात आले. पण डग आऊटमध्येगही तो जास्त काळ थांबला नाही. त्यानंतर कृणाल हा वैदकीय चाचणीसाठी गेला असावा, असे म्हटले जात आहे.
कृणाल पंड्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे लखनौच्या संघाचे टेंशन वाढले आहे.
[ad_2]