Lucknow Super Giants Beat Mumbai Indians Beat By 5 Runs In Last Over Thriller Of MI vs LSG IPL 2023 ; जिंकता-जिंकता मुंबईचा संघ हरला, इशानचे अर्धशतक वाया

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ : मुंबईच्या संघाने जिंकणारा सामना गमावला. मुंबईने झोकात सुरुवात केली आणि त्यांनी ९० धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा बाद झाला आणि त्यानंतर इशान आणि सूर्यकुमारही लवकर तंबूत परतले. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली आणि तिथेच हा सामना मुंबईच्या हातून निसटला. लखनौच्या संघाने मुंबईपुढे विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण मुंबईच्या संघाला १७२ धावा करता आल्या आणि त्यांना पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.लखनौच्या १७८ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा लवकर बाद होत होता. पण यावेळी रोहित खेळपट्टीवर टिकून राहीला. रोहितला अर्धशतक झळकावता आले नसले तरी त्याच्या खेळीने मुंबईच्या संघाला चांगली सलामी मिळाली. रोहितने यावेळी २५ चेंडूंत ३७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईच्या संघाला १० षटकांत ९० धावांची सलामी देता आली. इशानने यावेळी आपले अर्धशतक मात्र पूर्ण केले. पण अर्धसतकानंतर तो जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. इशानने ३९चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही सात धावांवर बाद झाला आणि त्यामुळे सामना अधिक रंगतदार झाला.

मुंबईने लखनौच्या संघाला सुरुवातीलाच धक्के दिले होते. मुंबईचा वेगवान गोलंदाज जेसन बर्डनहॉफने सलग दोन चेंडूंमध्ये लखनौच्या दौन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. जेसनने तिसऱ्या षटकातच सलामीवीर दीपक हुडाला पाच धावांवर बाद केले. त्यानंतरच्याच चेंडूवर जेसनने गेल्या सामन्यात मॅचविनर ठरलेल्या प्रेरक मांडकला शून्यावर बाद केले. जेसनने एकामागून एक दोन धक्के दिल्यावर लखनौचे कंबरडे चांगलेच मोडले. जेसन या आयपीएलमध्ये सातत्याने अचूक आणि वेगवान गोलंदाजी करत आहे. मुंबई इंडियन्सने लखनौची या सामन्यात जेसनमुळे २ बाद १२ अशी दयनीय अवस्था केली होती. त्यानंतर पीयुष चावलाने अजून एक धक्का लखनौला दिला. पण त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि कर्णधार कृणाल पंड्या यांची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी मिळून लखनौच्या संघाचा डाव सावरला. कारण या दोघांनी महत्वाच्या क्षणी अर्धशतक भागीदारी रचली. पण ४९ धावांवर असताना कृणाल जखमी झाला. त्याची दुखापत गंभीर होती. त्यामुळे त्याला ४९ धावांवर जखमी निवृत्ती व्हावे लागले. पण कृणाल मैदानाबाहेर गेला असला तरी मार्कसने मात्र धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्यामुळेच लखनौच्या संघाला १७७ धावांचा डोंगर उभारता आली. मार्कसने यावेळी झोकात आपले अर्धशतक झळकावले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

मार्कसने ४७ चेंडूंत चार चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद ८९ धावांची खेळी साकारली.

[ad_2]

Related posts